1(2) स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीचे बदललेले उद्देश सांगा.
Answers
Answer:
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर दोन्ही काळात भारतात स्त्री - चळवळी झाल्या होत्या.
Explanation:
१. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात झालेल्या स्त्री - चळवळीचा मुख्य हेतू स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायकारक प्रथा नष्ट करणे व सुधारणा करणे हा होता.
२. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात या उद्देशांमध्ये बदल झाले.
३. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समानाधिकार दिले.
४. मात्र, प्रत्यक्षात स्त्रियांना अधिकार मिळाले नव्हते. त्यांना समाजात समान वागणूक दिली जात नव्हती.
५. त्यामुळे, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले नव्हते.
६. खऱ्या अर्थाने स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे, हे स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री - चळवळीचे उद्दिष्ट बनले.
७. स्त्रियांना पुरुषांप्रमानेच समान अधिकार मिळावेत व त्यांना समाजात दर्जा मिळावा, हे स्त्री - चळवळीचे उद्देश आहेत.