1. "बापरे! केवढा मोठा साप!" या वाक्याचा प्रकार ओळखा. *
a.उद्गारार्थी
b.प्रश्नार्थी
c.आज्ञार्थी
d.विधानार्थी
Answers
Answer:
.विधानार्थी
1. "बापरे! केवढा मोठा साप!" या वाक्याचा प्रकार ओळखा. *
Answer:
"बापरे! केवढा मोठा साप!" हे उद्गारार्थी वाक्य आहे.
Explanation:
वाक्याचे अनेक प्रकार पडतात.
वाक्याचे प्रकार खालील प्रमाणे:
होकारार्थी वाक्य:
ज्या वाक्यातून होकार दर्शविला असतो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहणार्थ: गणेश शाळेत जायला तयार झाला.
नकारार्थी वाक्य:
काही नकारात्मक शब्दांचा वापर करून जेव्हा वाक्यातून नकार दाखवलेला असतो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ- मला अननस आवडत नाही.
विधानार्थी वाक्य:
दिलेल्या वाक्यात एक साधे विधान केले असेल त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ- सुरज पुस्तक वाचतो.
प्रश्नार्थक वाक्य:
ज्या वाक्यातून प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात.
उदारणार्थ -आज कोणता वार आहे?
आज्ञार्थी वाक्य-
ज्या वाक्यातून एखादी गोष्ट करण्याची आज्ञा केली असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ- घर स्वच्छ करून ठेवा.
उद्गारार्थी वाक्य-
ज्या वाक्यातून उस्फुर्त अशा भावना व्यक्त केलेल्या असतात त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
उदारणार्थ- १.बापरे! केवढा मोठा साप!
२. अरेरे! त्याचे वडील वारले.