Science, asked by jyoti4596, 1 year ago

1. बॅटने चेंडू टोलावताना बॅटची गती कमी होणे2. बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे3. अग्निबाणाचे प्रक्षेपणया उदाहरणांचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे कसे कराल?

Answers

Answered by ajaybh3103
1

न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम सांगतो. "Every Motion Has Equal & Opposite Reaction".म्हणजेच प्रत्येक गतीवर किवा बलवर त्याच्या इतकेच समान पण विरुद्ध किवा negative बल  कार्यरत असते.  

उदाहरण 1

जेव्हा आपण बॅट ने चेंडू समोरच्या दिशेला वेगाने टोलावतो तेव्हा आपण चेंडू मारण्यासाठी जेवढा जोर लावला तेवढाच जोर न्यूटनच्या तिसर्‍या नियमानुसार आपल्या बॅटवर लागला गेला. त्यामुळे आपल्या बॅटचा वेग कमी झाला.

उदाहरण 2

बॅटप्रमाणे बंदुकीचे देखील कारण आहे मागे सरकण्याचे. जेव्हा बंदुकीचा चाप ओढला जातो तेव्हा गोळीला वेग मिळवा याकरता बंदूक बल निर्माण करते त्यामुळे त्या बलाला समान पण विरुद्ध दिशेचे बल निर्माण होते. आणि गोळी पुढे मारल्यामुळे बंदूक मागे सरकते.

अग्निबाणाला अवकाशात  उडण्यासाठी खूप इंधन वापरुन बल निर्माण करावे लागते मात्र त्याच्या समान पण विरुद्ध दिशेच्या बलाला टाळण्यासाठी अवकाश केंद्रात अनेक उपकरणे असतात.

Answered by gadakhsanket
0
★उत्तर -1) जेव्हा बॅटने चेंडू टोलवला जातो तेव्हा चेंडूदेखील समान परिमाणाचे बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो. चेंडूवरील बल त्याची गती वाढवितो व बॅटवरील बल त्याची गती पुढच्या दिशेने कमी करते.

2) जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते.तेव्हा बंदूक आणि गोळी समान परिमानाची परंतु विरुद्ध बले एकमेकांवर प्रयुक्त करतात.गोळीवर प्रयुक्त झालेल्या बलामुळे गोळीची गती वाढते.व बंदुकीवर प्रयुक्त झालेल्या बलामुळे बंदूक मागे सरकते.

3)अग्निबाण पेटविल्यानंतर अग्निबाणातील इंधन जळण्यास सुरुवात होते तेव्हा रासायनिक अभिक्रिया होऊन गरम वायू मोठ्या बलाने खालच्या बाजूने बाहेर फेकला जातो त्याचवेळी बाहेर पडलेला वायू सामान परिमाणाचे; परंतु विरुद्ध क्रियाबल प्रयुक्त करतात. हे प्रतिक्रियाबल
जास्त असल्यामुळे अग्निबाण जोरात अवकाशात उडतो.

धन्यवाद...
Similar questions