1. बायोगॅस संयंत्रात कोणकोणते पदार्थ कुजवते जातात ?
Answers
Answer:
बायोगॅस संयंत्रासाठी प्रामुख्याने जनावरांचे शेण, डुकरे-कोंबड्याची विष्ठा, जनावरांचे मूत्र, शौचालय जोडलेले असल्यास मानवी विष्ठा, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, वाया गेलेल्या भाजीपाल्यांचे बारीक तुकडे इत्यादीचा वापर करता येतो. मात्र बायोगॅस संयंत्रामध्ये ओले गवत, हिरवा पाल्याचा लागलीच वापर केल्यास गॅस प्लॅंटमध्ये आम्लता वाढण्याचा धोका असतो, म्हणून हे पदार्थ पाच दिवस चांगले कुजवून नंतर संयंत्रात सोडावे. लाभार्थीकडे जनता प्रकारचा बायोगॅस असेल तर सदर संयंत्राचे इनलेट (पूरक कुंडी) मोठे असते. बायोगॅस संयंत्रामध्ये शेणराडा किंवा इतर कुजणारे पदार्थ पाण्यासोबत त्याच्या विशिष्ट प्रमाणात घातले असता त्यांची नैसर्गिक कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. सदरची प्रक्रिया हवेच्या अनुपस्थितीत होते. कुजण्याची प्रक्रिया निर्वातीय किटाणूमुळे सुलभरीत्या होते. तयार होणारा गॅस वरच्या डोममध्ये साठविण्यात येतो. सदर गॅसमध्ये मिथेन वायू 50 ते 75 टक्के, कार्बनडाय ऑक्साईड 25 ते 50 टक्के तसेच हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजनचे प्रमाण एक टक्क्यापर्यंत असते.
बायोगॅस संयंत्रातील पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी स्लरी गॅसच्या दाबामुळे बाहेर पडते. स्लरी हे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. बायोगॅस संयंत्रामध्ये कुजण्याची प्रक्रिया हवाविरहित होत असलेमुळे मानवी विष्ठा अगर इतर प्राण्याची विष्ठा वापरण्यात कोणतीच अडचण येत नाही. बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी फिनाईल, डिटर्जंट साबणाचा वापर करू नये. यामुळे निर्वातीय किटाणू मारले जाऊ शकतात, तसेच पदार्थ कुजवण्याची प्रक्रिया बंद पडू शकते.