1. बहिर्गोल भिंगाच्या नाभीय अंतराच्या साहाय्याने संयुक्त सुक्ष्मदर्शीचे कार्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
2
Answer:
भिंग : एक किंवा दोन वक्रपृष्ठांमध्ये अंतरित केलेल्या पारदर्शक माध्यमाच्या खंडाला भिंग असे म्हणतात. चष्मे, दूरदर्शक (दुर्बिणी), सूक्ष्मदर्शक, कॅमेरे इ. विविध प्रकारच्या प्रकाशीय उपकरणांमध्ये भिंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
इतिहास : काचेचा पोकळ गोल पारदर्शक द्रवाने भरल्यास त्यातून वस्तू (त्यांच्या प्रतिमा) मोठ्या झालेल्या दिसतात, ही गोष्ट प्राचीन ग्रीक व रोमन शास्त्रज्ञांना माहीत होती. इ. स. १५० मध्ये टॉलेमी (क्लॉडियस टॉलेमस) या प्रख्यात ग्रीक शास्त्रज्ञांनी आपल्या Optics या ग्रंथात अशा गोलांच्या काही गुणधर्मांचे वर्णन केले आहे. अकराव्या शतकातील अल्हॅझेन (इब्न अल हैथम) या अरब शास्त्रज्ञांनी आपल्या ग्रंथात या स्वरूपाच्या भिंगाबद्दल चर्चा केली आहे.
Similar questions