History, asked by pranitwankhade6, 3 months ago

1.भौतिक साधने म्हणजे काय, सोदाहरण स्पष्ट करा ​

Answers

Answered by tanuja200746
2

Answer:

भौतिक साधने :- इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनाची माहिती घेऊ. नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. यांपैकी नाणी व संग्रहालय यांची माहिती आपण प्रथम घेणार आहोत. नाणी :- नाणी व नोटांवरून सुद्धा आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर चलन छापखाना हा नाशिक याठिकाणी आहे. तुम्हाला जी नाणी दिसत आहेत यात १९५० पासून ते आज आपण वापरत असलेल्या नाण्यांचा समावेश असलेली नाणी आहेत. यावरून आपल्याला त्यांचे धातू, त्यांचे आकार, त्या नाण्यांवरील विषयांवरील विविधता यांवरून त्याकाळातील भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. प्रत्येक नाण्यांखाली साल / वर्ष दिले आहे. तसेच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूवर अशोक स्तंभावरील सत्यमेव जयतेचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूस विविध चित्रे आहेत. व नाण्यांचे मूल्य आहे. संग्रहालये :- भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तुसंग्रहालये आहेत. त्यांवरून आपणास त्या राज्याचा व पर्यायाने देशाचा इतिहास समजण्यास मदत होते. उदा. महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय व पुणे येथील रिझर्व बँकेचे संग्रहालय, सातार मधील शिवकालीन वस्तुसंग्रहालय, औंध येथील संग्रहालय, दिल्लीतील बिर्ला हाउस येथील संग्रहालय ज्यामध्ये महात्मा गांधीच्या वस्तू संग्रही करून ठेवल्या आहेत. त्याआधारे आपणास इतिहासाचा अभ्यास करणे सोपे जाते.

Explanation:

Mark as brainliest

Similar questions