1
by
atay = 6
от - by EC
Answers
Answer:
प्रत्येकाला लहानपणी एक सामान्य प्रश्न विचारला जातो,तो म्हणजे तुला मोठे होऊन कोण व्हावेसे वाटते? तेव्हा वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळतात.कोण म्हणते मला डॉक्टर व्हायचाय,तर कोणाला पायलट,तर कोणाला सैनिक.माझे उत्तर अशावेळी असायचे की मला मोठे होऊन शिक्षक व्हायचे आहे.
एक शिक्षक बनून मी माझ्या विद्यार्थ्यांना अभ्यास अगदी सोप्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करणार.माझ्या विद्यार्थ्यांशी मी मैत्रीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करेल,जेणेकरून त्यांना माझी भीती वाटणार नाही.मी त्यांच्या शंकांचे योग्य ते उत्तर देईल.
त्यांना अभ्यासी ज्ञान तर देणारच, पण त्याच सोबत इतर विविध गोष्टीसुद्धा शिकवणार.चांगली मानवी मूल्ये शिकवणार,त्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकसित करण्याचा मी प्रयत्न करेल.माझ्याकडे जितके ज्ञान आहे,तितके ज्ञान मी त्यांना द्यायचे प्रयत्न करेल.
सामाजात एका शिक्षकाला फार आदर मिळतो. देशासाठी चांगले व जागृत नागरिक तयार करण्याची जबाबदारी एका शिक्षकावर असते.इतके महत्वाचे काम करणारे शिक्षक मला व्हायला नक्कीच आवडेल आणि त्यासाठी मी खूप मेहनत करणार.
Step-by-step explanation: