India Languages, asked by sanikadumbre970, 8 months ago

1) चाहूल येणे. 2) सहिसलामत बाहेर पडणे .
वरील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

चाहूल येणे म्हणजे हालचालींचा पूर्व अंदाज येणे किंवा पूर्व सूचना मिळणे.

वाक्यात उपयोग-

१.शिवाजी महाराजांना शत्रूच्या हालचालींची अगोदरच चाहूल लागत होती.

२. पक्षांना व प्राण्यांना येणाऱ्या नैसर्गिक संकटाची अगोदरच चाहूल  लागते.

३. चोरांना आपण आता पकडले जाऊ याची चाहूल लागली होती.

सहीसलामत बाहेर पडणे म्हणजे एखाद्या संकटातून सुरक्षितरित्या बाहेर पडणे.

वाक्यात उपयोग-

१. शिवाजी महाराज आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर औरंगजेबच्या तावडीतून सहीसलामत बाहेर पडले.

२. काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या कैद्यांना तेथून सहीसलामत बाहेर पडणे शक्य नव्हते.

३. राम शत्रूच्या तावडीतून सुटून सहीसलामत बाहेर पडला आणि त्याने सुटकेचा श्वास सोडला.

Answered by yogitadardigmailcom
1

Answer:

चाहुल लागणे

Explanation:

मला माझ्या मित्राच्या येण्याची चाहुल लागली

Similar questions