1) झोपमोड होणे . 2) चेंदामेंदा करणे. 3) कित्ता गिरवला .4) तोंडसुख घेणे .
वरील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा .
Answers
Answered by
13
Answer:
1. मध्ये मध्ये जाग येणे
this is answer
Answered by
0
झोपमोड होणे म्हणजे अर्ध्यातून जाग येणे.
वाक्यात उपयोग-
- गणपती उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात वाजणाऱ्या ढोल मुळे सर्व सामान्य जनतेची झोपमोड होते
- खूप जोरात आवाज आल्यामुळे अन्वीची झोप मोड झाली.
चेंदामेंदा करणे म्हणजे खूप नुकसान करणे.
वाक्यात उपयोग-
- रानात रानडुकरांनी प्रवेश केल्यामुळे संपूर्ण पिकाचा चेंदामेंदा केला.
- शेतातून माल घरी आणण्याच्या वेळेला पाऊस पडल्यामुळे सर्व मालाचा चेंदामेंदा झाला.
कित्ता गिरवला म्हणजे दुसऱ्यांप्रमाणे अनुकरण करणे.
वाक्यात उपयोग
- अजयने शाळेत चोरी करून त्याच्या वडिलांचा कित्ता गिरवला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव खराब केले.
- परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे आशिष ने यशस्वी होण्याच्या आपल्या कुटुंबाचा कित्ता गिरवला.
तोंड सुख घेणे म्हणजे एखाद्यावर टीका करून आनंद घेणे किंवा मनसोक्त पणे बोलणे.
वाक्यात उपयोग
- नवीन आलेल्या सुनेवर मालतीने खूप तोंडसुख घेतले.
- आपल्या चुकीत सापडलेल्या नोकरावर मितालीने खूप तोंडसुख घेतले.
वाक्यात उपयोग याबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://brainly.in/question/29785315
https://brainly.in/question/40111632
#SPJ3
Similar questions