1.काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी =
२. काळी काठी,तेल लाटी, वाकते पण मोडत नाही =
३. तळ्यात तळं,तळ्यात खांब, शेपटीने पाणी पितो गंगाराम =
४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी =
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली =
६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे =
७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या =
८. घाटावरून आला भट,त्याचा काष्टा घट =
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा =
१०. एवढसं पोर,घर राखण्यात थोर =
११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी =
१२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले =
१३. पाऊस नाही,पाणी नाही,रान कसं हिरवं
कात नाही,चुना नाही,तोंड कसं रंगलं =
१४. लहानसे झाड,त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा =
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर =
१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान =
१७. हरण पळतं,दूध गळतं =
१८. आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई =
१९. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय =
२०. वीस लुगडी,आतून उघडी =
२१. सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा नव्हे,गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे
Answers
Answered by
88
Answer:
10 कुलुप
Explanation:
१०. एवढसं पोर,घर राखण्यात थोर = कुलुप
Answered by
5
Answer:
कोडे म्हणजे एक विधान, प्रश्न किंवा वाक्प्रचार ज्याचा दुहेरी किंवा आच्छादित अर्थ असतो, ज्याचे निराकरण करण्यासाठी एक कोडे म्हणून मांडले जाते.
Explanation:
- 1.काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी =कढई, तेल, पुरी
- २. काळी काठी,तेल लाटी, वाकते पण मोडत नाही =डोक्यावरचे केस
- ३. तळ्यात तळं,तळ्यात खांब, शेपटीने पाणी पितो गंगाराम = समई, तेल, वात
- ४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी =डोळे
- ५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली =शेंबुड
- ६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे = दात आणि जीभ
- ७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या =चांदण्या व चंद्र
- ८. घाटावरून आला भट,त्याचा काष्टा घट =कांदा
- ९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा= शहाळे
- १०. एवढसं पोर,घर राखण्यात थोर =कुलूप
- ११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी =फुंकणी
- १२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले =उंबराचे फुल
- १३. पाऊस नाही,पाणी नाही,रान कसं हिरवं कात नाही,चुना नाही,तोंड कसं रंगलं =पोपट
- १४. लहानसे झाड,त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा =ओवा
- १५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = वांगे
- १६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान =जीभ
- १७. हरण पळतं,दूध गळतं =दळणाचे जाते
- १८. आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई =बासरी
- १९. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चामड्याची वहाण
- २०. वीस लुगडी,आतून उघडी =मक्याचे कणीस
- २१. सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा नव्हे,गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे= पाण्याचा रहाट
त्यामुळे हे उत्तर आहे.
#SPJ2
Similar questions