1.कथा लेखन(story writing)
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.
मुद्दे-:- संध्याकाळची वेळ----खूप
गर्दी...--श्रीमंताचे पैशाचे पाकीट
पडणे-----गरीब विद्यार्थी-----पाकीट
हेडमास्तरकडे देणे--श्रीमंताचे शाळेत
येण----प्रामाणिकतेच फळ,मराठी
Answers
Answer:
प्रामाणिकपणाचे फळ
Explanation:
एकदा शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या बाहेर निघाले. संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर खूप गर्दी होती. संध्याकाळी भरपूर लोक कामानिमित्त घराबाहेर पडण्याची वेळ आणि शाळा सुटण्याची वेळ एकच झाल्यामुळे रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अजय हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता पण तू खूप प्रामाणिक होता. रस्त्यावरून गर्दीतून जात असताना त्याला अचानक त्याच्या पायाला एक पैशांचे पाकीट लागले. कारण थोड्यावेळापूर्वी एका श्रीमंत माणसाचे त्या गर्दीत पैशांचे पाकीट पडले होते.
अजयने ते पाकीट उचलले आणि बघितले तर त्यात खूप पैसे होते. अजय जरी पैशाने गरीब असला पण मनाने मात्र खूप श्रीमंत होता. त्याच्या आई-वडिलांचे संस्कार त्याच्यात होते आणि म्हणूनच कुठलाही पैशांना हात न लावता तो परत माघारी फिरला व शाळेत जाऊन ते पैशाचे पाकीट आपल्या मुख्याध्यापकांना दिले. मुख्याध्यापकांना अजयचा खूप अभिमान वाटला. पाकिटातून त्यांना एक ओळखपत्र मिळाले व त्यांना त्यावरून त्या श्रीमंत माणसाला मुख्याध्यापकांनी फोन करून शाळेत बोलावून घेतले.
तो श्रीमंत मनुष्य शाळेत आल्यानंतर त्याने अजय चे खूप कौतुक केले. आणि त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्या पाकीटा मधून काही पैसे अजयला दिले. अजय नाही म्हटला परंतु त्या माणसाच्या आग्रहाखातर पुस्तक घेण्यासाठी त्याने ते पैसे घेतले. शिक्षणाबद्दलची आतुरता पाहून त्या श्रीमंत व्यक्तीने त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण खर्च करण्याचा विचार केला आणि अजयला आपल्या प्रामाणिक पणाचे फळ मिळाले.