History, asked by crazyforstudy321, 15 days ago

1) मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल?
2) वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by dapushree
7

गांव व वसाहती – शेतीच्या शोधामुळे त्याला एकाच ठिकाणी अन्न मिळू लागले. त्यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता येवून तो घर करून राहू लागला. शेतीच्या कामाकरिता त्यास इतरांची गरज भासू लागली. त्यामुळे एकमेकास सहाय्य करण्यार्‍या माणसाचा गट तयार होवून ते एकत्र राहून एकमेकास संरक्षण देवू लागते. त्यामधून ग्रामीण वस्तीचा विकास झाला. आणि वस्तीचे रूपांतर गावामध्ये होवू लागले.

नागरी संस्कृतीच उदय – स्थिर झालेल्या समाजव्यवस्थेला गतीमानता आणण्यामध्ये चाकाचा शोध हा क्रांतिकारक ठरला. नवाश्मयुगामध्ये चाकाचा शोध लागला असावा असे म्हटले जाते. मानवास उंचावरून घरंघळत येणार्‍या ओंडक्यावरुन चाकाची संकल्पना सुचली. चाकाचा सर्वात प्रथम वापर कुंभाराने भांडी तयार करण्याकरिता केला असे म्हटले जाते. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीला सुरवात झाली. जगातील बहुतांशी संस्कृती नदी काठच्या प्रदेशात विकसित झाली आहे. त्यामध्ये भारतातील सिंधु संस्कृती, आशिया खंडातील तैग्रिस, युफ्रेटिस व चीनची संस्कृती, नाईल नदीच्या खोर्‍यात विकसित झालेली इजिप्तची संस्कृतीचा विकास नदयाच्या प्रदेशातच झाला आहे.

Answered by vedika9184
2

Answer:

मानवाच्या जीवनातील शेतीचा शोध हा त्याला स्थिरता आणण्यास उपयोगी ठरला.

शेतीचा शोध लागल्यामुळे त्याची भटकंती संपवून स्थिर जीवनास सुरुवात झाली.

hope it's helpful

Similar questions