(1) 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाचा आशय तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answer:
या पाठात लेखकाने त्याच्या आयुष्यातील 2 प्रसंगावरून आपल्याला शिकवण दिलेली आहे .
hope it is helpful for you..!
Explanation:
मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉ. काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे 'बार्क मधील अनुभव मुलांचे भावविध निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोटया छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात.
या पाठात डॉ. अनिल यांनी मुलांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी 'बार्क' या संस्थेतील त्यांचे अनुभव सांगितले आहे. 'बार्क' या संस्थेतील त्यांचे अनुभव सांगितले आहे. 'बार्क' हे, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर' म्हणजे 'भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघु रूप आहे. या संस्थेत ट्रेनिंगसाठी आलेले डॉ. अनिल यांनी होमी भाभा यांना विचारले की, आम्ही इतकी मुलंमुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे ? ते म्हणाले की, स्वतःच काम निर्माण करा आपण काय कामच करायचं हे स्वतःच ठरवा. बॉसने सांगितले तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भाभांनी सांगितलेला हा मुद्दा लेखकाच्या कायमचा मनावर कोरला गेला. म्हणून ते स्वानुभवाने सांगतात की, स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. दुसरा अनुभव असाच त्यांनी सांगितला आहे. लेखक इंजिनियर म्हणून बार्क संस्थेत जॉईन झाले. त्यांना तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगितले. यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती. लेखकांनी वेल्डर फोरमन ची मागणी केली पण ती त्यांना मिळाली नाही. "तुला आता काहीच मदत मिळणार नाही तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल." अशी वरीष्ठांची आज्ञा म्हणून लेखकांनी प्रयत्नांनी काम पूर्ण केले. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता है। आधि दाखवा मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसतानादुसऱ्यांना काम सांगणं, योग्य नाही. हा धडा दुसऱ्या अनुभवातून लेखक शिकले.