World Languages, asked by subhashgaykwad28, 11 months ago

1)मती गुंग होने,2)धडा शिकवणे,3)प्रतिबंध करणे व 4)मान ठेवने या वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.​

Answers

Answered by gautamdhotre176
4

Answer:

Explanation:

dhada shikne

Answered by sanket2612
0

Answer:

दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे.

१. मती गुंग होणे:

याचा अर्थ आहे गोंधळून जाणे, काहीच विचार न सुचणे.

वाक्य: प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बघून विशालची मती गुंग झाली.

२. धडा शिकवणे:

याचा अर्थ आहे एखाद्याला अद्दल घडवणे.

वाक्य: पोलिसांनी चोरांच्या मोक्याच्या जागेवर धाड टाकून त्यांना चांगलाच धडा शिकवला.

३. प्रतिबंध करणे:

याचा अर्थ आहे विरोध करणे, मज्जाव करणे, थांबवणे.

वाक्य: सरकारने जंगलातील प्राण्यांची शिकार करण्यावर प्रतिबंध केला आहे.

४. मान ठेवणे:

याचा अर्थ आहे आदर करणे, सन्मान करणे.

वाक्य: छोट्या मुलांनी मोठ्यांचा नेहमीच मान ठेवावा.

#SPJ3

Similar questions