Hindi, asked by ayna14ayna, 4 months ago

1) नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात, ते तुमच्या शब्दांत लिहा​

Answers

Answered by khanabdulrahman30651
4

Answer:

Explanation:

पाणीपुरवठा : पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, बागकाम व शेती, बाष्पशक्ती व जलविद्युत् शक्ती [→जलविद्युत् केंद्र] यांची निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारण, मूलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट (टाकाऊ द्रव्ये) वाहून नेणे इ. अनेक कामांसाठी होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने असा इशारा दिला आहे की, इ. स. २००० च्या सुमारास जेव्हा जगाची लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा १९७० साली लागत होते त्याच्या तिप्पट पाण्याची जरूरी असेल आणि त्या वेळी जगाला पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागेल. वर निर्दिष्ट केलेल्या पाण्याच्या प्रत्येक प्रकाराच्या वापरासाठी पाण्यामध्ये भौतिकी व रसायनशास्त्र यांच्या नियमांत बसणारे काही विशिष्ट गुणधर्म असण्याची जरूरी असते. त्यामुळे नैसर्गिक रीत्या मिळणाऱ्या पाण्यावर अनेक योग्य प्रक्रिया करूनच ते पाणी वापरावे लागते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न जागतिक महत्त्वाचा झाला असून तो प्रगत राष्ट्रांनाही भेडसावत आहे. प्रस्तुत नोंदीत गृहोपयोगी पाणीपुरवठा आणि औद्योगिक पाणीपुरवठा असे दोन भाग केले आहेत. गृहोपयोगी पाणीपुरवठ्यात त्याचा इतिहास, मागणी, मूळ, उपलब्धता, गुणवत्ता, शुद्धीकरण, वाटप, व्यवस्थापन, संशोधन इ. गोष्टींचा विचार केला असून औद्योगिक पुरवठा विभागात निरनिराळ्या उद्योगधंद्यांना लागणारे विशिष्ट प्रतीचे व प्रमाणातील पाणी, पाण्याचा पुनर्वापर इ. वार्बींचे विवरण केलेले आहे. पिकांच्या पाणीपुरवठ्यासंबंधीच्या माहितीकरिता ‘सिंचाई’ ही नोंद पहावी.

इतिहास : पाणीपुरवठ्याचा इतिहास मानवाइतकाच जुना आहे. पृथ्वीवरील पाण्याचा साठा सु. १.३९ x १०९ किमी. इतका असला, तरी मानवाला शुद्ध पाणी म्हणून उपयोगी पडेल असे त्यापैकी १% सुद्धा नाही. त्यामुळे पृथ्वीवरील लोकवस्ती ही जेथे पिण्यासाठी भरपूर प्रमाणात नैसर्गिक रीत्या पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी म्हणजे झरे, तळी, नद्या इ. ठिकाणांजवळ होत गेली. विहिरी खणून पाणी मिळवणे ही पूर्वापार चालत आलेली सर्वमान्य पद्धत होय. मात्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था गेल्या सहा-सात हजार वर्षापासूनच केली गेली. ईजिप्तमध्ये नाईल नदीवर सहा हजार वर्षांपूर्वी धरण बांधून पाणीपुरवठा केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. बॅबिलोनियात ४,००० वर्षापूर्वी, बल्लुचिस्तानात ३,५०० वर्षांपूर्वी, पर्शियामध्ये ३,००० वर्षांपूर्वी, ग्रीसमध्ये २,५०० वर्षांपूर्वी व रोमनांनी पण २,५०० वर्षांपूर्वी कालवे अथवा जलसेतूमधून [→जलवाहिनी] पाणीपुरवठा केल्याचे सर्वज्ञात आहे. रोम येथील पाणीपुरवठा व्यवस्थेचे अधीक्षक सेक्स्टस जूल्यस फ्राँटिनस यांच्या मूळ हस्तलिखितात. (इ. स. ९७) रोमन जलसेतूचा उल्लेख सापडतो. आफ्रिका व मध्य आशियातील देशांतही इसवी सानाच्या सुरूवतीस पाणीपुरवठ्याविषयी विचार केला गेला होता. पाण्याचा साठा करणे, ते उकळणे वा गाळणे अशा स्वरूपाच्या पाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्राथमिक प्रक्रियाही त्या काळी माहीत होत्या.

भारतातील पाणी पुरवठ्याचा इतिहासही पुष्कळ जुना आहे. ऋग्वेदात, तसेच रामायण, महाभारत या विख्यात ग्रंथांत व निरनिराळ्या पुराणांमध्येही जागोजागी विहिरीबद्दल उल्लेख केलेला आढळतो. रामायण, महाभारत, मनुस्मृती, भाषप्रकाश इ. अनेक जुन्या ग्रंथांत पाणी शुदध राखण्याविषयीचे उल्लेख सापडतात. मोहें-जो-दडो येथे इ. स. पू. २५०० सुमारास प्रगत स्वरूपाची पाणीपुरवठ्याची व्यवस्था अस्तित्वात होती, असा पुरावा उपलब्ध आहे. शहरी वस्तीसाठी पक्क्या विटांनी उत्तम तर्हेशने बांधलेल्या विहिरी, तसेच सांडपाण्यासाठी विटांनी बांधलेले निचरामार्ग तेथील उत्खननात आढळून आले आहेत.

जसजशी शहरे वसु लागली, लोकसंख्या वाढू लागली, उद्योगधंदे सुरू होऊन त्यांची वाढ झाली, तसतशी पाण्याची गरज अधिक लागून पाणीपुरवठा व पाण्याची शुद्धता ह्यांकडे जास्त लक्ष पुरविले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीनंतर पंपाचा [→ पंप] उपयोग करून खोलवर असलेले पाणी उपसून दूरवर नेण्याची शक्यता निर्माण झाल्याने अधिकाधिक पाणी उपलब्ध होऊ लागले. नळ टाकून घराघरात पाणी नेण्याची व्यवस्था ही त्या काळानंतरची होय. अनेक रोगांचा (उदा., पटकी, विषमज्वर, अतिसार इ.) पाण्याद्वारे फैलाव होण्याची शक्यता असते, हे वैद्यकशास्त्रातील शोधांमुळे सिद्ध झाले म्हणून पाणी शुद्ध करून पिण्याची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त निर्जंतुक केलेले पाणी पुरविण्याची जावाबदारी शासनावर पडते. या सर्व सुधारणा एकोणिसाव्या शतकात झाल्या. विसाव्या शतकात या शास्त्रातील संशोधनाचा वेग पुष्कळच वाढला असल्याने पाण्याचा पुरवठा व शुद्धीकरण ह्या बाबतींत अनेक सुधारणा झालेल्या आहेत.

पाण्याची मागणी : वर उल्लेख केल्याप्रमाणे पाण्याची गरज अनेक कामांसाठी असल्याने पाणीपुरवठा करताना खालील प्रकारच्या मागण्यांचा सामान्यतः विचार केला जातो.

.

Answered by omkardudhal07
0

Answer:

नदीच उपयोग जेवण कर्णासाथी होतो

Similar questions