Science, asked by jaydaware29sd, 5 months ago

1. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे​

Answers

Answered by pritisingh01012002
0

Answer:

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र : उद्योगधंद्यांतील प्रक्रियांसाठी किंवा उत्पादनासाठी सूक्ष्मजीवांचा कसा उपयोग करून घेता येईल, यासंबंधी विवेचन करणारे शास्त्र. सूक्ष्मजीव या संज्ञेत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या पुढील गटांचा समावेश होतो : (१) सूक्ष्मजंतू, (२) कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यविरहित वनस्पती) आणि (३) शैवले (शेवाळ्यासारख्या हरितद्रव्ययुक्त वनस्पती). क्लोरेलासारख्या काही शैवलांचा औद्योगिक प्रक्रिया करण्यासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत, पण त्यांचा किफायतशीर उपयोग करणे अद्यापि शक्य झालेले नाही. इतर दोन गटांतील सूक्ष्मजीवांचा उपयोग उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणात होतो. उदा., सूक्ष्मजंतूंचा उपयोग लॅक्टिक अम्ल, ब१२ जीवनसत्त्व, रिबोफ्लाविन इत्यादींच्या कवकांचा उपयोग अल्कोहॉल व पेनिसिलीन यांसारख्या महत्त्वाच्या पदार्थांच्या औद्योगिक उत्पादनासाठी होतो.

कित्येक सूक्ष्मजीवांची शरीरे किंवा शरीरांचे घटक हेच उद्योगधंद्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. उदा., यीस्ट नावाची सूक्ष्म वनस्पती (कवक) पाव बनविण्याच्या आधुनिक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरावी लागते. पण पुष्कळदा प्रत्यक्ष सूक्ष्मजीवांऐवजी त्यांच्याद्वारा निर्माण होणारे पदार्थ औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे असतात. उदा., निरेत किंवा गोड रसांत यीस्ट घातली म्हणजे तिच्या क्रियेमुळे उत्पन्न होणारे मद्य (अल्कोहॉल). सारांश, सूक्ष्मजीवांची वाढ होत असताना त्यांच्या शरीरात किंवा शरीराबाहेर मनुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पदार्थ तयार होत असतात. सूक्ष्मजीवांद्वारे घडणारी ही क्रिया म्हणजेच किण्वन क्रिया होय व ती औद्योगिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाची आहे. ॲमिनो अम्ले, अल्कोहॉले, मद्ये, प्रतिजैव पदार्थ (अँटिबायोटिक्स), जीवनसत्त्वे, ॲसिटिक अम्ल, सायट्रिक अम्ल इ. औद्योगिक रसायने, पाव इत्यादींच्या उत्पादनात किण्वन क्रिया मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

इतिहास : दुधापासून दही करणे, गोड रसांपासून किंवा धान्यांपासून मद्य तयार करणे इ. गोष्टींसाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग मानव कळत न कळत प्राचीन काळापासून करीत आलेला आहे. मद्य तयार करण्याची कृती प्राचीन कालापासून भारतीयांना माहीत होती, असे प्राचीन संस्कृत ग्रंथांतील उल्लेखांवरून दिसून येते. तथापि हे पदार्थ सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे तयार होतात हे एकोणिसाव्या शतकात कळून आले.

गे-ल्युसॅक या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांनी १८१० मध्ये अल्कोहॉली किण्वन हे पुढील समीकरणाने दाखविता येते, असे सिद्ध केले.

C6H12O6

2CO2

+

2C2H5OH

ग्लुकोज

कार्बन डाय-ऑक्साइड

एथिल अल्कोहॉल

जर्मन शरीरक्रियाविद टेओडोर श्वान, फ्रीड्रिख क्यूट्सिंग आणि फ्रेंच वैद्य शार्ल कान्यार द ला तूर यांनी स्वतंत्रपणे १८३७ मध्ये असे प्रतिपादले की, अल्कोहॉली किण्वन हे यीस्ट-कोशिकांच्या (पेशींच्या) शरीरक्रियेवर अवलंबून असते. पण या सिध्दांताला लीबिग, व्हलर व इतर बर्‍याच शास्त्रज्ञांनी विरोध केला. त्यांच्या मते किण्वन ही क्रिया रासायनिकच असली पाहिजे.

लूई पाश्चर यांनी १८५७ मध्ये याबद्दल बरेच प्रयोग करून किण्वन ही क्रिया सूक्ष्मजीवांच्या चयापचय (शरीरात सतत होणार्‍या भौतिक व रासायनिक घडामोडी) कार्यामुळे होते असे मत मांडले. तसेच निरनिराळ्या सूक्ष्मजीवांमुळे विविध प्रकारचे किण्वन घडते व किण्वन व सूक्ष्मजीवांची वाढ ही ऑक्सिजनशिवाय होते असेही त्यांनी प्रतिपादले. रासायनिक भाषेत किण्वनाची व्याख्या मांडण्याचा प्रयत्‍न माउरिट्स ट्रॉउबे यांनी १८५८ मध्ये केला. सर्व किण्वने ही सूक्ष्मजीवांत असणार्‍या एंझाइम [सजीव कोशिकांमध्ये रासायनिक विक्रिया घडवून आणल्यास मदत करणारे संयुग, → एंझाइमे] या पदार्थामुळे होतात व हे एंझाइम प्रथिनासारखे असते असे त्यांनी प्रतिपादले. याला रिकार्ट व्हिल्श्टेटर यांनी पाठिंबा दिला. १९२० मध्ये त्यांनी यीस्टमधून इन्व्हर्टेज हे एंझाइम वेगळे केले. ह्या इन्व्हर्टेजमुळे साखरेचे ग्लुकोज व फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होते.

एडूआर्ट बूखनर यांनी १८९७ मध्ये वाळूबरोबर यीस्ट कोशिका दळल्या व मिळालेल्या अर्कात साखर घालून त्याचे परिरक्षण (संरक्षण) करण्याचा प्रयोग केला. हे मिश्रण हळूहळू फसफसू लागले व कार्बन डाय-ऑक्साइड वायू त्यातून निघून अल्कोहॉल तयार झाले असे त्यांना आढळून आले.

पहिल्या महायुध्दापर्यंत मानवाला उपयुक्त अशा पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग करणे फारसे मान्यता पावलेले नव्हते. त्यावेळी ॲसिटोन, ब्युटेनॉल व काही विशिष्ट एंझाइमे यांचे सूक्ष्मजीवांचा उपयोग करून उत्पादन करण्यात आले. दुसर्‍या महायुद्धकाळात पेनिसिलीनच्या उपयुक्ततेचा शोध लागल्यानंतर किण्वन उद्योगाचा फार मोठा विकास झाला व सूक्ष्मजीवशास्त्राचे औद्योगिक महत्त्व प्रस्थापित झाले. अवकाश प्रवास, प्रदूषण (दूषितीकरण) व औद्योगिक अपशिष्टांची (निरुपयोगी पदार्थांची) विल्हेवाट यांसंबंधीचे काही प्रश्न सूक्ष्मजीवांचा उपयोग करून सोडविण्यात येत आहेत [→औद्योगिक अपशिष्ट प्रतिजैव पदार्थ प्रदूषण].

Answered by bhaktisankhala
0

Answer:

I don't understand your laungue

so sorry brother

Explanation:

Similar questions