History, asked by khsayyed1, 11 months ago

1) पुढील चित्राचे निरीक्षण करून हे चिन्ह ज्या बाबीशी संबंधित आहे, त्याविषयी माहिती लिया​

Attachments:

Answers

Answered by varadad25
15

Answer:

प्रस्तुत चित्र हे आधुनिक अॉलिम्पिक स्पर्धांचे बोधचिन्ह आहे.

Explanation:

१. अॉलिम्पिक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय पातळीवर दर चार वर्षांनी होतात.

२. अॉलिम्पिक स्पर्धांची सुरुवात ग्रीस देशात झाली होती.

३. प्राचीन काळात ग्रीस देशात अॉलिम्पिया या नगरराज्यात दर चार वर्षांनी विविध खेळांच्या स्पर्धा होत असत.

४. धावणे, थाळीफेक, घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्ठियुद्ध ( बॉक्सिंग ) असे मैदानी खेळ ग्रीक लोकांनी सुरू केले.

५. आधुनिक अॉलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी होतात. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे सन्मानाचे मानले जाते. जगभरातील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात.

६. प्रस्तुत चित्रात एकमेकांत अडकलेली पाच वर्तुळे दिसत आहेत. हे अॉलिम्पिक स्पर्धांचे बोधचिन्ह आहे. ते पाच गुणांचे प्रतिनिधित्व करते. मैत्री, सद्भाव, ईर्षा, शांततासंघभावना यांचे ते प्रतीक मानले जाते.

Answered by rlokhande329
2

Answer:

Jkalajajshaajaofafafgzogahpa

Similar questions