World Languages, asked by bhumichawre775, 3 months ago

(1) प्रसंगलेखन
:
शिक्षक दिन उत्सव
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सजावट
विविध कलांचे कार्यक्रम
विदयार्थ्यांची मेहनत
आनंद मेळा
वरील कार्यक्रमाला तुम्ही हजर होतात अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे वर्णन करा.​

Answers

Answered by unadpotrasufiya
89

Answer:

शिक्षक दिन भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या विशेष दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रति कृतज्ञता म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.अनेक शाळांमध्ये मोठ्या वर्गातले विद्यार्थी शिक्षक बनून आपल्या शिक्षकांची भूमिका निभावतात. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विशेष महत्त्व असते. विद्यार्थ्यांच्याच का प्रत्येकाच्या जीवनावर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो.भारताचे प्रथम उप-राष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी असतो. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. एकदा त्यांचे विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना सांगितले की ते त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छितात. त्यावर त्यांनी सांगितले होते, 'माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल.' हा दिवस १९६२ सालापासून शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्वतप्रचुर, व्यासंगी होते. त्यांना तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संपूर्ण देशभरात शिक्षक दिन उत्साहात साजरा होतो. या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. शिक्षकांना भेटवस्तू देतात. यादिवशी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले जाते. राष्ट्रीय स्तरावर या दिवशी शिक्षकांचा त्यांच्या कार्यासाठी शिक्षक पुरस्कार देऊन गौरव होतो. हा मानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो.आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचं (International Teachers Day) आयोजन ५ ऑक्टोबर रोजी होतं. या दिवशी काही देशांमध्ये सुट्टी असते. चीनमध्ये १० सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होतो. अमेरिकेत मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी शिक्षक दिन साजरा होतो. थायलँडमध्ये दरवर्षी १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा होतो.

Similar questions