1. पर्यटन व देशाचा विकास यांचा निकटचा संबंध कसा आहे? 2.भौतिक साधने म्हणजे काय ते स्पष्ट करा.
Answers
Explanation:
वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घराचे आणि इमारतीचे अवशेष सापडतात या शिवाय नाणी मुद्देही सापडतात या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते या सर्व वास्तू आणि वस्त किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात.
maza number siddhehwar shalemadhe ala ahe ani mi majlgaon madhe rahtey
उत्तर :-
1.
ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना पर्यटक भेट देतात. या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगाराची निर्मिती होते.
1. त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात.
2. वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात.
3. विविध प्रकारचे वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात.
4. पर्यटक वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे अनेक लहानमोठे उद्योगांना चालना मिळते.
5. यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारते. तसेच देशाचा विकास होतो.
अशा प्रकारे,
पर्यटन व देशाचा विकास यांचा निकटचा संबंध आहे.
2.
1. भौतिक साधने म्हणजे वास्तू, किल्ले, इमारती इत्यादी इतिहासाची साधने होत.
2. भौतिक साधनांद्वारे भूतकाळातील वास्तू व शिल्पकला यांचे आकलन होते.
3. पुरातत्वाशी संबंधित गोष्टींची माहिती मिळते.
4. पुरावस्तूंवर संशोधन करता येते.
अशा प्रकारे,
इतिहास आकलनात मदत करणारी भौतिक साधने महत्त्वपूर्ण असतात.