1) पत्र लेखन विषय--- पाणीपुरवठा नियमीत होत नसल्याबद्दल तक्रार करणारे पत्र पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखाला लिहा
Answers
दिनांक १७.१२.२०१८
प्रति,
माननीय संपादक ,
लोकमित्र वृत्तपत्र,
विरार,
महोदय,
आपण आपल्या प्रतिष्ठित आणि प्रविख्यात वृत्त पत्रात माझ्या एका पत्राला जागा देण्याची कृपा कराल का ?? या पत्राद्वारे, मला आमच्या क्षेत्रातील सामान्य लोकांच्या तक्रारीवर लक्ष केंद्रित करायचा आहे. अनियमित पाणी पुरवठा आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे.यामुळे या परिसरातील रहिवाशांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागते.ह्या वर्षी पाऊस ही ठीकच पडला आणि धरणाची पातळी ही ठीकच आहे .विद्युत पुरवठा पण चांगला आहे तरीही कपात पाणी पुरवठा करण्या मागचं कारण लक्षात येत नाही .मागच्या काही दिवसात जराही पाणी पुरवठा झाला नाही.यामुळे खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे.मला असं वाटतं हे सर्व जल वितरण विभागाच्या चुकीच्या आणि लापरवाही कार्यप्रणाली मुळे झालं आहे.
कृपया करून माझा हे पत्र स्वीकारा आणि तुमच्या वृत्त मान पत्रात स्थान द्या जेणे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार जाईल आणि आमचे पाण्याचे प्रश्न सुटतील तसेच दोषी व्यक्तींना शासन होईल.
कळावे.
एक उपभोगता
मनीष नलावडे
विरार