1 point १) श्रवण हे भाषिक कौशल्यांमधील पायाभूत कौशल्य आहे.अर्थात पायाभूत कौशल्य जेवढे अधिक चांगले तेवढी त्यावर आधारलेली इतर कौशल्ये प्रभावी ठरतील.*
1 संपूर्ण विधान चूक आहे
2 संपूर्ण विधान बरोबर आहे
3 संपूर्ण विधान संशयास्पद आहे
4 यापैकी नाही
Answers
Answer:
विनिमयातून इतरांचे विचार, भावना ग्रहण केले जातात. शब्द विचारक्रियेला उपयुक्त ठरतात. नवनवे विचार भाषेद्वारा आत्मसात केले जातात. विचारशक्तीचे त्यामुळे वाढीस लागते. दुसऱ्या बाजूने भावजीवनही भाषेने पुष्ट होते. मानवाच्या शेषत: नव्या पिढीच्या सहजप्रेरणांना वळण लावण्याचे, त्यांचे उन्नयन व उदात्तीकरण करण्याचे सामर्थ्य भाषेत आहे. या दृष्टीने विचार करता मानव ज्याप्रमाणे भाषेचा निर्माता आहे, तशीच भाषा ही देखील मानवाची निर्माती व धात्री आहे. मानवाचा जो अतूट संबंध आहे तो असा.
भाषा भावनाविकासाला साहाय्य करणारी आहे. बुद्धीबरोबर भावनेचा विकास होगे, व्यक्तिविकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अंतःकरण संवेदनक्षम असणे, त्यांच्या सत्प्रवृत्त भावनांशी समरस होता येणे, हीच सुसंस्कृतता आणि रसिकता है भाषेमुळे सहजशक्य आहे. त्यातूनच व्यक्तिमत्त्वविकास घडून येतो..
भाषा ही प्रामुख्याने सामाजिक विनिमयासाठी आहे. त्या विनिमयाला आरंभ आत्मनिवेदनापासून होतो. स्वतःच्या गरजा, विचार व भावना दुसऱ्याला कळवून त्याचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यावयाचे, त्याला आपल्या गरजा तृप्त करण्यासाठी प्रवृत्त वयाचे, हा भाषेचा प्रमुख उद्देश आहे; तर दुसऱ्या बाजूने इतरांचे मनोगत जाणून घेऊन त्यानुसार आपल्या विचार वर्तनांत बदल करावयाचा, हे ही भाषेचेच कार्य आहे. अशा तऱ्हेने भाषा, व्यक्तीचा समाजाशी संबंध प्रस्थापित करते. व्यक्तीला विचार करण्यास माध्यम म्हणून उपयोगी पडणे हे भाषेचे दुसरे कार्य आहे. मानवांना होणारे ज्ञान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा व संकल्प भाषाच प्रकट करते. व्यावहारिक जीवनाच्या पातळीवर दैनंदिन जीवनाच्या गरजा पार पाडण्यासाठी भाषेचा उपयोग प्रामुख्याने होतो.
हा उपयोग साधावयाचा म्हणजे चांगले बोलता येणे, दुसऱ्याचे बोलणे समजणे, दुसन्याला एखादा विचार स्पष्ट सांगून कार्यप्रवृत्त करणे, दुसऱ्यांनी तोंडी अथवा लेखी सांगितलेला विचार नीट समजणे, या महत्त्वाच्या गरजा भागविण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये असते व त्यामधूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ शकतो.
वैयक्तिक व सामाजिक व्यवहार पार पाडण्यासाठी भाषा हे एक प्रभावी साधन आहे. ते साधन हाताळता येण्यासाठी भाषेची प्राथमिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. ती कौशल्ये आत्मसात करता करताच व आत्मसात झाल्यावर व्यक्तीचा सामुदायिक व सांस्कृतिक जीवनाच्या अंगाने विकास होतो. या बाबतीत पुरेसे सामर्थ्य व कौशल्य आल्याशिवाय वाङ्मयीन वा साहित्यिक दृष्टीने भाषेचा अभ्यास व उपयोग करता येणे कठीण आहे.
व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये / ७भाषा हे कौटुंबिक व सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. ते यशस्वी व परिणामकारक रीतीने हाताळता येण्यासाठी एक साधनीभूत विषय म्हणून श्रवण, वाचन, संभाषण, भाषण, लेखन ही कौशल्ये विकसित व्हायला हवीत. त्यातूनच विद्याथ्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होऊन त्यांचा विकास होऊ शकतो.
४. भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वविकास
श्रवण, वाचन, संभाषण, लेखन आणि भाषण ही भाषेची प्राथमिक कौशल्ये म्हणून ओळखली जातात. ह्या कौशल्यांचा विकास आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास यांचा परस्पर संबंध आहे. ह्या कौशल्यांच्या विकासाने व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होण्यास मदत होते. भाषेच्या विकासासाठी या प्राथमिक कौशल्यांचा विकास होणे आणि तिचे उपयोजन होणे गरजेचे असते. शालेय, महाविद्यालयीन जीवनातच या भाषिक कौशल्यांच्या वापराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला मदत होऊ शकते.
अ. श्रवणकौशल्य
श्रवण हे भाषिक कौशल्यांमधील पायाभूत कौशल्य आहे. अर्थात, पायाभूत कौशल्य जेवढे अधिक चांगले तेवढी त्यावर आधारलेली इतर कौशल्ये प्रभावी ठरतील. बोलता न येणारे लहान मूल श्रवणातूनच भाषेतील शब्द, शब्दसमूह, वाक्याची रचना ओळखते व नंतर आत्मसात करून वापरू लागते. हा अनुभव भाषाविकासातील श्रवण कौशल्याचे महत्त्व स्पष्ट करतो.
प्रभावी श्रवणकौशल्य स्वतःकडे असणे म्हणजेच समाजात बावरताना लागणाऱ्या विचारांच्या आदान-प्रदानाचे एक महत्त्वाचे साधन स्वतःकडे असणे. श्रवणकौशल्यात आकलन व अर्थीकरण या दोन्ही क्रियांना स्थान दिले आहे. म्हणजेच श्रवण ही निष्क्रियपणे घडणारी क्रिया नसून ती आपल्या सक्रिय सहभागाने घडणारी क्रिया आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
बहिरेपण नसलेल्या व्यक्तीपैकी प्रत्येकजण श्रवण करू शकतो; असे असले तरी फारच थोड्या व्यक्तींकडून दर्जेदार श्रवण घडते. संशोधनाने असे सिद्ध झालेले आहे की, बऱ्याच व्यक्तींमध्ये श्रवणक्षमता अल्प प्रमाणात व निकृष्ट प्रतीची असते; यातून एक गोष्ट लक्षात येते की, श्रवणक्षमता निसर्गदत्त नाही. आपल्याला ऐकू येते म्हणजेच श्रवणही करता येते असे नाही. श्रवणकौशल्ये शिकलो तर मात्र आपण फलदायी श्रवण निश्चितच करू शकू.
वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की, ऐकण्याच्या क्रियेपेक्षा श्रवण ही क्रिया गुंतागुंतीची व वरच्या दर्जाच्या मानसिक प्रक्रियांची गरज असलेली क्रिया