Math, asked by aawejshaikh103, 1 month ago

1). सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय ? सामाजिक सुरक्षितता या संकल्पनेचाभारतीय
संविधानातील महत्व स्पष्ट करा.​

Answers

Answered by anwi44
2

Answer:

sorry hindi is not allowed in maths page

Step-by-step explanation:

Answered by sreeya555
1

Answer:

( सोशल सिक्युरिटी ). व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली. सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती. माणसाच्या आयुष्यात काही अकल्पित दुर्घटना घडत असतातत्यांतून आर्थिक असुरक्षितता वाढतेत्या संकटांना तोंड देणे कठीण जाते. फार पूर्वी व्यक्ती व त्याचे कुटुंब स्वतःच आर्थिक सुरक्षिततेची जबाबदारी वाहत असे स्थानिक समूह किंवा चर्च हे काही प्रमाणात मदतीचा हात देत. हळुहळू अधिक संघटित संस्थांद्वारे मदत देण्याची पद्घत विकसित झाली. भूतदया, मानवता, अहिंसा, शांतता आणि करुणा ही मूल्येही कुटुंबाने दुःखी आणि पीडित व्यक्तींना साहाय्य करण्यासाठीच बालपणापासून व्यक्तीच्या मनावर बिंबविलेली असत. माणसाने सुरूवातीपासूनच आर्थिक सुरक्षितता संपादण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले. सर्वांनी आनंदी व सुखी जीवन व्यतीत करावे असे मानवी प्रयत्न असत. ‘सर्व माणसे सुखी असावीत’ अशा संस्कारामागे सर्व माणसे सुरक्षित असावीत असेच अभिप्रेत असते. त्याकाळी निसर्गाची कृपा असेपर्यंत सर्व काही सुरळीत चालत असे; परंतु निसर्गाची अवकृपा झाली आणि महापूर, भूकंप, साथीचे रोग, दुष्काळ इ. आपत्ती आल्या; तर माणसे मृत्यूमुखी पडत, अपंग होत, निराधार होत. अशा वेळी माणसे आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचून जात. ज्यावेळी आर्थिक आपत्तींना तोंड देणे व्यक्ती वा कुटुंबालाही कठीण जाई, त्यावेळी माणसे कुटुंबाबाहेरील समूह आणि समाजाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहू लागतात, यातूनच ‘सामाजिक सुरक्षा’ ही संकल्पना प्रसृत झाली आणि प्रत्यक्ष कृतीत अवतरली.

Similar questions