1 संवाद लेखन
वाढत्या प्रदूषणा बाबत तुम्ही आणि तुमच्या मित्र/मैत्रिणी मधील संवात लिहा
Answers
Explanation:
(मीना आणि रिया रोज गाडीने क्लास ला जातात आज त्या काही कारणांनी चालत जाणार होत्या. मीना गार्डनजवळ आली होती.)
मीना: (रियाला फोनवर) आग तू आहेस कुठे? मी कधीपासून तुझी वाट बघत आहे गार्डनच्या इथे.
रिया: अग ही बघ आलेच. तुझ्या मागे आहे.
मीना : हा ये .
(रिया मीनाच्या इथे पोहोचते)
रिया: अगं काय गं हे ट्रॅफिक! किती कंटाळा येतो ह्या ट्रॅफिकचा! मी कशी बशी त्या ट्रॅफिक मधून वाट काढत आले.
मीना : हो ना ! आग आज काल सगळेच स्वतःच्या गाड्या घेऊन चालवायला लागले आहेत त्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे.
रिया: अगं हो गं! आणि त्यामुळे किती प्रदूषण वाढले आहे!
मीना: ह्या वाढत्या प्रदूषणामुळे किती त्रास होतो.
रिया: अगं मी तर येताना मास्क लावून आले.
मीना: ह्या प्रदूषणामुळे लोकांना खूप आजार व्हायला लागले आहेत.
रिया: हो गं ! आपण तरी काय करणार?
मीना: अगं हा ! आपण अस करू आपल्या घरच्यांना सांगून आपण शाळेत जाताना सार्वजनिक वाहनांचा वापर करू सुरुवात आपण करू नंतर आपण आपल्या मैत्रिणींना पण सांगू. त्यामुळे थोडे तरी प्रदूषण होणार नाही असं हळू हळू एक एक करता खूप जणांनी सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर खूप प्रदूषण टाळले जाईल.
रिया: हा मी आजच माझ्या आईला सांगते. चाल आता क्लास आला जवळ आपला .
मीना: हो गं! बघ ना वेळ कसा गेला कळलंच नाही.
रिया : आपण रोज क्लास ला पण चालत येत जाऊ तेवढाच व्यायाम आपला .
मीना: हा चालेल मी आईला सांगते की आता आपण रोज चालत जाऊ क्लास ला आणि चालत येऊ घरी.
रिया: हा चालेल चाल बाय आता.
मीना: हा बाय.
Explanation:
Here Is Your Answer! Ok bye