India Languages, asked by vpkhosre, 19 days ago

(1)* तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. (1) झुळकेची परोपकारी वृत्ती. उत्तरः​

Answers

Answered by shindereshmabajirao
2

Answer:

कवितेतील मुलाला झुळूक बनायचे आहे. झुळूक बनून मन ओढ घेईल तिथे त्याला स्वच्छंदपणे विहरायचे आहे. बाजारात, नदीकाठी, बागेत, अगदी पडक्या वाड्यापाठीही त्याला फेरफटका मारायचा आहे; पण अशा विविध गमतीजमती करता करता त्याला झुळूक बनून इतरांना उपयोगी ठरतील अशीही कामे करायची आहेत.

त्या झुळूकेला बागेत जाऊन कळीला हळूवार स्पर्श करायचा आहे. तिच्या या कृतीने कळी फुलणार आहे व तिचे फूल बनल्यावर त्यातील सुगंध सोबत नेऊन झुळकीला तो सर्वत्र उधळून द्यायचा आहे, वातावरण सुगंधी करायचे आहे. इतरांतील चांगुलपणाचा दरवळ सर्वत्र पसरवून एखादे चांगले काम करण्याची, इतरांना मदत करण्याची झुळकेची वृत्ती यातून दिसून येते.

याशिवाय, झुळकेला झऱ्याचा झुळझुळ असा मंजुळ नाद, गाण्याची एखादी अर्धवट गुणगुणलेली तान सर्वत्र पसरवायची आहे. शेतावरून व नदीवरून तरंग उठवत जायचे आहे. आपल्या हळूवार स्पर्शाने त्यांच्यातही चैतन्य निर्माण करायचे आहे. हीच झुळूक बांबूच्या वनातून बासरीसमान स्वर निर्माण करत, शेतातील कणसांना स्पर्श करत, बकुळफुले डोहात शिंपत व जांभळांचा नदीकाठावर सडा पाडत जाणार आहे. म्हणजे, ही झुळूक जिथे जाईल तिथे आनंद निर्माण करणार आहे.

दिवसभर अथक परिश्रम करून, थकूनभागून येणाऱ्या व्यक्तीचा शीण, थकवा घालवण्यासाठी ती त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून त्याला प्रसन्न, ताजेतवाने करणार आहे. एखाद्याच्या आयुष्यात चैतन्य, आनंद, उत्साह, आशा, नवी उमेद भरण्याचे कार्य करणारी अशी ही झुळूक नक्कीच परोपकारी वृत्तीची आहे असे मला वाटते.

Similar questions