India Languages, asked by paramchotaliya, 10 months ago

1)ध्यास घेणे -अर्थ आणि वाक्य
2)मन दुखावणे जाणे-अर्थ आणि वाक्य
3)स्तंभित होणे-अर्थ आणि वाक्य
4)बलिदान करणे-अर्थ आणि वाक्य
5)गुणगान करणे-अर्थ आणि वाक्य
plz answer this question these are very important​

Answers

Answered by rajraaz85
8

Answer:

१.ध्यास घेणे- मनाचा निश्चय करणे

राहुल ने वार्षिक परीक्षेत उत्तम गुणांनी पास होईल याचा ध्यास घेतला आहे.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचा ध्यास घेणे खूप महत्वाचे असते.

२. मन दुखावणे- हृदयावर आघात करणे.

राहुलला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याच्या आई-वडिलांचे मन दुखावले.

आपल्या वाईट वर्तणुकीमुळे एखाद्याचे मन दुखेल असे वागू नये.

३. स्तंभित होणे- थक्क होणे

शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून सर्व जनता स्तंभित झाली.

चंद्रावर माणसाने पहिले पाऊल ठेवल्यावर सर्व जनता स्तंभित झाली.

४. बलिदान देणे- आहुती देणे

सैनिक देशासाठी स्वतःच्या आयुष्याचे बलिदान देतात.

आई-वडील मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखांचे बलिदान देतात.

५.गुणगान करणे- प्रशंसा करणे

शिक्षक हे हुशार विद्यार्थ्यांचे नेहमी गुणगान करत असतात.

महात्मा गांधींनी समाजासाठी दिलेल्या समर्पणा बद्दल त्यांचे नेहमी गुणगान केले जाते.

Similar questions