1.वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी
महाराजांवर केलेले विविध संस्कार लिहा?
Answers
Answer:
वीरमाता जिजाबाई शिवरायांना रामायण, महाभारतातील रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या कथा, गोष्टी सांगत असत. त्यांनी शिवरायांना धनुर्विद्या, घोडेस्वारी, युद्धनीती, इत्यादी. कलांचे ज्ञान अवगत करून दिले.
Answer:
जिजाबाई या पराक्रमी, धाडसी व शूर योध्दा होत्या. स्वराज्य उभे करण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. जिजाऊंचे पुत्र शिवाजी महाराज यांच्यावर लहानपणापासूनच त्यांनी अनेक संस्कार केले.
लहानपणी महाराजांना स्वराज्य रक्षणाचे बाळकडू पाजले. महाराजांना कर्तुत्ववान योद्ध्यांच्या गोष्टी सांगणे, कृष्णा, राम, बलाढ्य भीम, अर्जुन यांच्या गोष्टी सांगून महारांजावर संस्कार केले. महाराजांना शस्त्रविद्या शिकवत असताना त्या स्वतः जातीने लक्ष घालत. जिजाबाईंनी महाराजांना कर्तव्या बरोबर राजनिती चे धडे देखील दिले. त्या सांगत न्याय करताना सर्वांना समान न्याय द्यावा.
अपराध करणाऱ्याला कठोरात कठोर शासन करावे. असे संस्कार जिजामातांनी महाराजांवर केले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजामातांनी महाराजांकडून पूर्ण करून घेतले. त्यासाठी त्यांनी महाराजांमध्ये संस्काराचे बीज पेरले.