1)वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी भारत सरकारने कोणत्या उपाय योजना केल्या आहेत ?
Answers
Answered by
5
Answer:
पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. वन्य जीवांच्या बरोबरीने पृथ्वीतलावर मानव गुण्यागोविंदाने नांदत आला आहे परंतु गेल्या २-३शतकांत माणसाने वन्य जीवांची प्रमाणाबाहेर हत्या केली अन्नासाठी त्यांच्याशी स्पर्धा करू लागला तसेच प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजोत्पादनास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली व त्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या. अशा रीतीने वन्य जीवांना जीवनसंघर्षात टिकून राहणे अवघड झाले, कारण त्यांच्यापुढील या अडचणींवर त्यांना मात करता येणे शक्य नाही. परिणामी पुष्कळ जीवजाती नष्ट किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जगभराच्या विचारवंतांनी विज्ञानयुगाच्या सुरुवातीस होती तशी विविधता पूर्ण जीवसृष्टी परिरक्षित किंवा पुनःस्थापित करण्याकडे आपले लक्ष वळविले.
Similar questions