10 lines on my village in marathi
Answers
हल्लीच्या दुनियेत मला वाटत प्रत्येकाला गाव हा शब्द प्रचलित असेल याचे कारण असे कि बहुतांश लोक हल्ली नोकरीच्या निम्मिताने त्यांचे मूळ जन्मस्थान सोडून शहरात वसले आहेत. त्यामुळे कधी ना कधी प्रत्येक जण जन्मस्थानी जातच असेल. खरंच गाव म्हणलं कि डोळ्यांसमोर येते ती नवी दुनिया ! आपले जुने घर, चावडी,गावातील मोठे देऊळ, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता आणखी बरंच काही !आणि गावाला जायला म्हणावं तर संपूर्ण मन शहारून येते. तसे माझे गाव कोकणात वसले आहे त्यामुळे उन्हाळ्यात आंबे फणस काजू पावसाळ्यात मासे खेकडे आणि हिवाळ्यात शेकोटीची मजा तर काही औरच आहे. गणपती ,दिवाळी शिमगा इत्यादी सणांना तर पूर्ण गावच बहरलेलं असतं. तिकडची गोड माणसे ,निसर्ग ,आणि लाल माती तर मन मोहून टाकते .असं आहे माझं गाव. खरंच तुम्ही पण कधीतरी माझ्या गावाला या ते तुमची वाट नक्कीच पाहत असेल.