10 Lines on Pollution in Marathi Language Essay, Speech |...
Answers
Essay on pollution in Marathi is underhand

■■प्रदूषण■■
आजच्या काळात प्रदूषण एक गंभीर समस्या बनली आहे. दिवसेंदिवस जगभरात प्रदूषण वाढत चालले आहे. प्रदूषण कोणत्या प्रकारचा असो, पण त्याचे परिणाम खूप वाईट आणि गंभीर असतात.
प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत: वायुप्रदूषण,भूमी प्रदूषण, जल प्रदूषण.त्याचबरोबर ध्वनिप्रदूषण,रेडियो धर्मी प्रदूषण,प्लास्टिक प्रदूषण,प्रकाश प्रदूषण हे प्रदूषणाचे आणखी काही प्रकार आहेत.
कारखाण्यातून येणारे दूषित व हानिकारक पाणी,कचरा, गाड्यांमधून निघणारे धूर,जीवाश्म इंधनांचा अत्याधिक वापर,जंगलतोड, कारखाण्यातून व गाड्यांचा येणारा हॉर्नचा आवाज हे सगळे प्रदूषणासाठी जबाबदार काही कारणं आहेत.
प्रदूषणामुळे पर्यावरण,प्राणी,जलचर जीवन आणि आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे त्वचेच्या समस्या,श्वसन समस्या,अस्थमा,हॄदयाच्या समस्या,डोकेदुखी,तणाव,ऐकण्यात समस्या येणे, चिडचिडेपणा,वेगवेगळे प्रकारचे कैंसर होऊ शकतात.
जीवाश्म इंधनांचा वापर न करून त्याजागी सौर ऊर्जा,वायु ऊर्जा,भूगर्भीय ऊर्जेचा वापर करणे,गाड्यांच्या जागी सायकलचा वापर करणे.
प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी कागदी किंवा कापडी पिशवी वापरणे.वृक्षारोपण करणे,डीजे,स्पीकर,गाड्यांचा हॉर्न गरज नसल्यास न वाजवणे या काही गोष्टी करून आपण प्रदूषणाचे प्रमाण कमी करू शकतो.