10std #कथालेखन पुढील मुद्दे विचारात घेऊन कथा लिहा. मिठाईचे दुकान _ गरीब उपाशी मुलगा _मिठाईचा वास घेतो. _मिठाईवाला पैसे मागतो # चाणाक्ष वकील ऐकतो _ खिशातून नाणी वाजवतो _ मिठाईचा वासाची किंमत _ मिठाईवाला गप्प.
Answers
Answer:
एके काळी एक मिठाईवाला त्याच्या दुकानात दुपारच्या सुमारे बसलेला असतो. त्या ठिकाणच्या दुकानांमध्ये शक्यतो दुपारचे ग्राहक येत नाही म्हणून त्याचा डोळा लागणारच असतो की त्याला एक लहान मुलाचा आवाज त्याला ऐकू येतो. तो मुलगा तेथे येतो व उभा राहतो, मिठाईवाला त्याच्यावर गुपचूप बारीक नजर ठेवून असतो. तो मुलगा गरीब असल्यामुळे त्याच्याकडे पैसे नसतात, म्हणून तो फक्त मिठाईचं वास घेउन तृप्त होतो आणि तेथून निघणारच असतो, तेच मिठाईवाला त्याला धरतो आणि त्याच्याकडून पैसे मागतो. त्या मुलाला कळे ना कि हा मिठाईवाला त्याच्याकडे का पैसे मागतोय, मग तो मिठाईवाला त्याला सांगतो की त्याने त्याच्या मिठाईचा मधुर वास घेतला आहे आणि त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल. त्या बिचाऱ्या मुलाकडे पैसे नसतात म्हणून तो रडायला लागतो. दोघांचं हे संभाषण एक बाजूला उभा चाणाक्ष वकील ऐकत असतो. तो या दोघांच्या मध्ये येतो व मिठाईवाल्याला सांगतो की तो त्या मुलाच्या वरचे पैसे मिठाईवाल्याला देईल. हे ऐकून मिठाईवाला फार खुश होतो आणि वकिलांकडून पैसे मागतो. वकिलाच्या खिशात त्या वेळी काही नाणी असतात आणि तो खिशात हात घालतो व ती नाणी एकदा खळ-खळ वाजवतो आणि हसतो. मिठाईवाल्याला काही समजेनासे होते आणि तो रागात येऊन परत वकिलाकडे पैसे मागतो. मग तो वकील ते मिठाईवाल्याला सांगतो की त्या छोट्या मुलानी मिठाईचा फक्त वास घेतला आहे मिठाई खाल्ली नाहीये, आणि मिठाईचा वास घेण्याची किंमत त्याने त्या मिठाईवाल्याला नाण्यांचा एकदा खळ-खळ आवाज करून कधीच चुकवलेली आहे. हे ऐकून मिठाईवाल्याला त्याची चूक कळते आणि तो लाजेने गप्प होतो.