History, asked by sureshsirvi47547, 8 months ago

10th history. Lesson no. 1.

इतिहासाचा अभ्यास का केला जातो?​

Answers

Answered by varadad25
3

Answer:

इतिहासाचा अभ्यास केला जातो.

Explanation:

१. इतिहास म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांची व्यवस्थितपणे दिलेली माहिती होय.

२. इतिहास हा आपल्या पूर्वजांचा असतो.

३. भूतकाळात त्यांनी काय केले व काय नाही, हे आपल्याला इतिहासच्या अभ्यासातून कळते.

४. इतिहासामुळे आपल्याला एखाद्या विशिष्ट काळातील विविध माहिती मिळते.

५. जसे, घरांच्या रचना, लेखनपद्धती, संस्कृती, परंपरा, इत्यादी गोष्टी इतिहासाद्वारे समजतात.

६. इतिहासाता आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत, त्यांचे आपण अनुकरण करू नये, हे आपल्याला इतिहासातून समजते.

७. इतिहासात काही तज्ज्ञ व्यक्ती झाल्या असतील, तर त्यांचे कार्य आपल्याला इतिहासाचा अभ्यास केल्यावर समजते.

८. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या हडप्पा, मोहजोंदडो व सिंधू या महत्त्वपूर्ण संस्कृतींची माहिती आपल्याला इतिहासच्या अभ्यासातून मिळते.

अशा प्रकारे, इतिहासाचा अभ्यास करून आपल्याला भविष्याचे योग्य नियोजन करता येते व योग्य वाटचाल करता येते.

म्हणून, इतिहासाचा अभ्यास केला जातो.

Similar questions