14 वें वेतन आयोग सर्वात जास्त निजी कोणत्या राज्याला मिळतो
Answers
Answer:
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्वाकांक्षीउपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे.महाराष्ट्राने पंचायत राज संस्थेची मुहूर्तमेढ रोवल्याने राज्याला गौरवशाली परंपरा आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे देशातील एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा पातळीवर धोरणात्मक निर्णय, तालुका स्तरावर पर्यवेक्षकीय कामकाज व ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. चौदाव्या वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार केले तर मिळणाऱ्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.ग्रामपंचायतींना त्यांच्या स्व:उत्पन्नाच्या बाबीशिवाय चौदाव्या वित्त आयोगांतर्गत मोठ्या प्रमाणावर अबंधित / मुक्तनिधी प्राप्त होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीच्या नियोजनाचे अधिकार ग्रामसभेला आहेत.
त्यामुळे ग्रामस्तरावर लोकसहभागातून गावांच्या गरजा, उपलब्ध साधनसामग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करुन परिपूर्ण आराखडे तयार होणे आवश्यक आहे.
‘आमचा गाव आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीचे सन 2015-20 या कालावधीचे ग्रामपंचायत पंचवार्षिक विकास आराखडा व प्रत्येक वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी गावातील शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, महिला, युवक-युवती, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी,विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांशी विविध स्तरावर विचारविनिमय केला जाणार आहे. त्यातून गावांच्या गरजांची निश्चिती व अपेक्षित उत्पन्न अंदाज घेवून प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. म्हणून हे सर्वसमावेशक आराखडे तयारव्हावेत,यासाठी नांदेड येथे नुकतीच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.