15
115) तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषा शिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा,
41to50
126)सर्व सामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची संधी द्यायला हवी या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा 511060
13
1413)- स्वाध्याय-2 (Assignment-2) 5 Mark's
1 बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलन ने गोळा केले या वाक्याचा अर्थ स्पष्ट पारा, roll no11010
16
17 2 तुमच्या मते हेलन केलर ध्या आयुष्यात पहिल्यांदा उद्याची वाट का पाहत असेल
11 to 20
3"शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते याविषयी तुमचे मत निक
22to30
4व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या 311040
5" तुम्ही पाहिलेला व तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा 41to50
6- लेखकाच्या मुलाने पारव्याच्या जोडीचा आश्रय त्यांचे घरटे कारोबार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले ही घटना तुम्हाला काय सांगते ते
22
23 prepaired by Mrs Madhuri Barkade
24
25
26
18
79
20
21
Answers
Answered by
4
Explanation:
- QUE:-तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषा शिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा,
- ANS:- कोणतीही भाषा शिकताना, तिचे उच्चार शिकताना स्वरांचे ज्ञान आवश्यक असते. बधिरत्व असलेल्या मुलांना ऐकू येत नसल्याने त्यांना उच्चाराचे ज्ञान सहज प्राप्त होत नाही, तसेच अंधत्व असल्यास अक्षर ओळख, वाचन या गोष्टींमध्ये अडथळे येतात. थोडक्यात, भाषाशिक्षणात भाषण, वाचन, लेखन हे महत्त्वाचे टप्पे असतात व दिव्यांग मुलांना अंधत्व, मुकेपणा, बहिरेपणा, यांमुळे भाषेचे स्वर ऐकू येणे, ते उच्चारता येणे, वाचता येणे, अक्षरे लिहिता, ओळखता येणे या सर्वच बाबतींत अडथळे येतात.
- QUE:-सर्व सामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची संधी द्यायला हवी या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा 511060
- ANS:- भारतीय संविधानानुसार सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांपासून वेगळे ठेवून भेदभाव केला जातो, यामुळे दिव्यांग मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. सर्वसामान्य मुले व दिव्यांग मुले एकत्र शिकल्याने दोन्ही मुलांना सहकार्य, सामंजस्य हे गुण आत्मसात करता येतील. दिव्यांग मुलांना सहानुभूती देण्यापेक्षा ते समाजाचाच एक भाग असून त्यांना ते आहेत, तसेच स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. समान संधी दिल्याने ही मुले स्वावलंबी बनतील व त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल. समान शिक्षण संधीमुळे सर्वसामान्य मुलेही दिव्यांगांना समजून घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक देण्यास शिकतील. अशाप्रकारे, समान संधीमुळेच दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील
स्वाध्याय-2
- QUE:- बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलन ने गोळा केले या वाक्याचा अर्थ स्पष्ट पारा
- ANS:- बाईंनी एक दिवस नव्या बाहुलीऐवजी जुनी, चिंध्या झालेली बाहुली लेखिकेच्या मांडीवर ठेवली व हातावर d-0-1-1 हा शब्द लिहिला. नव्या व जुन्या दोन्ही बाहुल्यांसाठी एकच शब्द पाहून लेखिका गोंधळली व लेखिकेने ती बाहुली जमिनीवर आपटली. बाईंनी तुटलेल्या बाहुलीचे तुकडे झाडून शेकोटीजवळ लोटले; परंतु जेव्हा बाईंनी पाणी हा शब्द प्रत्यक्ष पाण्यात तिचा हात धरून शिकवला तेव्हा लेखिकेच्या मनात चैतन्य निर्माण झाले. विहिरीपासून घरी आल्यावर त्यांना मोडलेली बाहुली आठवली. लेखिकेस आपली चूक जाणवली होती व तुकडे जोडून बाहुली पुन्हा तयार करण्यासाठी हेलनने शेकोटीजवळ लोटलेले तुकडे गोळा केले. हेलनचा शिक्षणाकडे पाहण्याचा बदललेला सकारात्मक दृष्टिकोन येथे दिसून येतो.
- QUE:- तुमच्या मते हेलन केलर ध्या आयुष्यात पहिल्यांदा उद्याची वाट का पाहत असेल
- ANS:- अॅनी सुलिव्हॅन या शिक्षिकेची भेट होण्यापूर्वी हेलन केलरचे आयुष्य अज्ञानाच्या अधकारात हरवले होते. बहिरेपणा, अंधत्व व मुकेपणा यांमुळे तिचे जीवन एकाकी झाले होते; परंतु नवीन शिक्षिकेमुळे व त्यांच्या प्रयोगशील अध्यापन पद्धतीने हेलनला शब्दांची ओळख होऊ लागली. जेव्हा परिचित वस्तूंची नावे तिला कळू लागली तेव्हा तिच्या जीवनात चैतन्य निर्माण झाले. पूर्वी हेलनचे आयुष्य हे समुद्रात वाट चुकलेल्या जहाजाप्रमाणे होते, ज्यास निश्चित असा मार्ग ठाऊक नव्हता; परंतु अॅनी सुलिव्हॅन या बाईंनी तिला ज्ञानाचा मार्ग दाखवला. तिच्या मूक जगात शब्द व शब्दांचे अर्थ उमटू लागले. नवनवीन शब्द शिकण्याचा उत्साह तिच्यात निर्माण झाला आणि या शिकण्याच्या ओढीमुळेच हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा 'उद्याची वाट पाहत असावी असे मला वाटते.
- QUE:- शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते याविषयी तुमचे मत निक
- ANS:- शब्दकोडे सोडवल्यामुळे निरनिराळे शब्द आपणास परिचित होतात. भाषेचा वापर करून विषय सोप्यात सोपा करून सांगता येतो. शब्दकोड्यामध्ये विविध कृतीची नावे विचारली जातात. साहित्य याबद्दलची माहिती विचारली जाते. त्यामुळे शब्दभांडार वाढते. म्हणून ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.'
- QUE:-तुम्ही पाहिलेला व तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा
- ANS:- व्हेनिस या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. फक्त प्रचंड मोठ्या आकाराचे कालवे आणि त्यांना जोडणारे पूल आहेत, त्यामुळे या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावरची धक्काबुक्कीही नाही. या सर्व गोष्टी नसणारे जगातले हे एकमेव शहर आहे. खरे म्हणजे रूढ अर्थाने हे शहरच नव्हे, तर हा अनेक छोट्या बेटांचा पुंजका आहे, जो दुरून निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा दिसतो. येथे वाहनांची नव्हे, तर नावांची ये-जा असते. किनाऱ्यावरून संथपणे सरकणाऱ्या प्रवाशांच्या नावांची येथे वर्दळ असते. कोणालाही कसलीच घाई-गर्दी नसते, त्यामुळे हे शहर म्हणजे निवांतपणा, उत्साह व उत्सव असल्याचे लेखकास वाटते.
- QUE:- लेखकाच्या मुलाने पारव्याच्या जोडीचा आश्रय त्यांचे घरटे कारोबार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले ही घटना तुम्हाला काय सांगते ते
- ANS:- पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी मोक्याची जागा निवडतात. माणसाप्रमाणेच पक्ष्यांनादेखील एकांत प्रिय असतो. तसेच, धोक्यापासून सुरक्षितता हादेखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. अशा वेळेस जर कुणीही त्यांच्या शांततेचा, एकांताचा वारंवार भंग केला, तर पक्ष्यांना असुरक्षितता जाणवते. अशा वेळेस राहण्याची जागा सोडून जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो, म्हणूनच आपण पक्ष्यांच्या शांतताप्रियतेचा विचार करून त्यांना त्रास देऊ नये, ही गोष्ट मला वरील घटनेवरून जाणवली.
prepaird :-Mrs Madhuri Barkade
ANSWERD BY:- PRANIT NAGRE
please mark as brainliest bro..
Similar questions