15 August eassy in Marathi
Answers
Read more at: https://teenatheart.com/mr/independence-day-15-august-speech-essay-marathi/
Answer:
१५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा केला जातो.याच दिवशी,१९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.
पूर्वी भारतावर इंग्रजांचे शासन होते.त्यांनी आपल्या देशाला गुलाम बनवले होते.आपल्यावर खूप अन्याय केले होते.त्यांचा,आपल्या देशातील मोठमोठ्या देशभक्तांनी विरोध केला.लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले.खूप मेहनत केल्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
आपल्या देशात स्वातंत्र्यदिवस हा राष्ट्रीय उत्सव उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो.शाळा,कॉलेज व आपल्या परिसरातील विभागात झेंडावंदन केले जाते.महापुरुषांबद्दल व देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याबद्दल गोष्टी सांगितल्या जातात. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात.शाळा,कॉलेजमध्ये वकतृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.
घरोघरी झेंडे उभारले जातात.राष्ट्रध्वजाचे बिल्ले छातीवर लावतात.अभिमानाने "भारत माता की जय" म्हणतात.
अशा प्रकारे,हा राष्ट्रीय सण भारतभर अभिमानाने साजरा केला जातो.
Explanation: