History, asked by yasinshah4385, 8 months ago

1979 मध्ये सुवर्ण मंदिरा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली तिला काय म्हणतात

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

  • सुवर्ण मंदिर : पंजाब राज्यातील शिखांचे उपासनामंदिर, गुरुद्वारा आणि एक प्रसिद्घ पर्यटनस्थळ. ते अमृतसर शहरात एका भव्य तलावाच्या मध्यभागी वसले आहे. हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर इ. नावांनीही त्याचा उल्लेख होतो. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिब पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. त्यामुळे या मंदिराला शीख धर्मपीठाचे महत्त्व प्राप्त झाले. शिखांचे चवथे गुरु रामदास यांनी त्याचा पाया घालून तेथेच एक नगर वसविले. पुढे शिखांचे पाचवे गुरु ⇨ अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचा अभिकल्प अर्जुनदेव यांनी शीख धर्मातील प्रतीके व संकल्पना यांनी परिपूर्ण बनविला. त्याची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मूळ वास्तू दुमजली व त्यावर घुमट असावा. तिचे मातीच्या विटेचे बांधकाम सुबक होते. मंदिराच्या उभारणीत भव्यतेपेक्षा साधेपणावर विशेष भर दिला आहे. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे असून सर्व जाति-धर्मांच्या स्त्री-पुरुषांना ते खुले आहे. येथील तलावाला ‘अमृत सरोवर’ आणि त्या भोवतीच्या शहराला ⇨ अमृतसर म्हणतात. अमृतसर अर्जुनदेवांनी वसविले. अहमदशहा अब्दाली याने या मंदिरावर विध्वंसक हल्ला केला (१७६२). पुढे शिखांच्या बाराव्या मिस्लने मंदिराची झालेली पडझड दूर करुन पुनर्बांधणी केली (१७६५). महाराजा रणजितसिंग (कार.१८०१–१८३९) यांनी मंदिराच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता त्याची पुनर्बांधणी संगमरवर दगडात केली व कळस तांब्याच्या पत्र्याने मढवून त्याला सोन्याचा मुलामा चढविला. तेव्हापासून ते सुवर्णंमंदिर म्हणून ख्यातनाम आहे. गुरुद्वारा व्यवस्थापन अधिनियमानुसार शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी या लोकनियुक्त मध्यवर्ती मंडळाद्वारे त्याचे व्यवस्थापन चालते. शिखांच्या संदर्भातील सर्व निर्णय घेणारे ‘अकाल तख्त’ हरिगोविंद यांनी मंदिरासमोर बांधले आहे (१६०६). मंदिराच्या परिसरात अनेक लहान मंदिरे असून त्यांत शिखांच्या ऐतिहासिक शौर्यगाथा दर्शविणाऱ्या धातूंच्या तबकड्या लावल्या आहेत. त्यावर वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत.
Similar questions