(2) आत्मकथन:
मी सैनिक
बोलतोय.
हवामान,
सीमांचे रक्षण,
अतिरेकी हल्ले,
अंतर्गत सुव्यवस्था,
शिस्तबद्ध जीवन,
नागरिकांना सहकार्य,
वरील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
Answers
Answer:
मी सैनिक बोलतोय -
मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. तेच मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे आहे. आज दहा महिन्यांपासून मी घर सोडले आहे. घरच्यांसोबत मला कमी वेळ घालवता आला. अचानक मला फोन आला सीमेवर अकस्मात गडबड चालू आहे. अतिरेक्यांचे हल्ले सुरू झाले आहे. त्यामुळे मंजूर केलेली रजा सुद्धा रद्द झाली. सीमांचे रक्षण करण्यासाठी मी तातडीने निघालो. डोळे पुसतच मी घरच्यांचा निरोप घेतला.
दोन दिवसांचा खडतर प्रवास करून सीमेवरील छावणीत हजर झालो. छावणीत आल्यावर कळले अतिरेक्यांचे हल्ले सतत चालू आहे. त्यामुळे सर्वांना सावध राहायला हवे असा इशारा देण्यात आला. अतिरेकी हल्ले करत असताना अंतर्गत व्यवस्था वाढवण्यात आली. बऱ्याचदा या हल्ल्यांमध्ये वीर पुत्र शहीद झाले. तर काही जखमी झाले.
सैनिकाचे जीवन हे शिस्तबद्ध असते. रोज पहाटे लवकर उठायचे, कवायत करायची, दिलेल्या वेळेवर हजर राहायचे. सैनिकाचे जीवन हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे असते. त्यांच्यासाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अतिरेकी हल्ले होत असतांना सर्वात आधी नागरिकांना सहकार्य करावे लागते त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते.
डोळ्यात तेल घालून या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते. तासनतास खडा पहारा द्यावा लागतो. आम्ही जनतेच्या सुरक्षेची हमी घेतलेली असल्यामुळे जनता आमच्यावर भरभरून प्रेम करते. आमच्या माता, भगिनी सणावाराला आम्हाला भेटवस्तू पाठवतात. ते बघितल्यावर डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.
सैनिक असल्याचा मला अभिमान वाटतो. या भूमातेचे मी नेहमी रक्षण करेल. माझे प्राण पणाला लावेल. जाता जाता मी इतकंच सांगतो, सैनिकाशी असलेले तुमचे नाते असेच कायम जपून ठेवा.
#SPJ3