(2) आत्मकथन :
सौंदर्य -
मी झाड बोलतोय...
वृक्षसंवर्धन अशी कल्पना करून आत्मवृत्त लिहा.
Answers
Answered by
11
नमस्कार ! मी झाड बोलतोय. आज मी तुमच्यासमोर माझे मत व्यक्त करणार आहे. मला असं वाटतं की सध्याच्या आधुनिक जगात तुम्ही मला विसरलातचं.
मी झाड, मी तुम्हासर्वांना ऑक्सिजन देतो. मनुष्य असो वा कोणताही जीव ऑक्सिजविना जगूच शकत नाही. तसेच प्राण्यांना, वृद्धांना, लहान मुलाना उन्हांपासून वाचवून थंडगार सावली देतो. तसेच फळे, फुले, कागदासाठी लाकुड अशा अनेक गोष्टींवर मनुष्य व प्राणी अवलंबून आहेत. आणि आम्ही झाडे कुणाशीही भेद-भाव करत नाही.
परंतु आत्ताच्या आधुनिक काळात गरजेपेक्षा जास्त वापर केला जात आहे, कारण नसताना नाही झाडे कापली जात आहेत, व त्या जागी मोठी-मोठी इमारत बांधली जात आहेत.
माझी तुम्हां सर्व मनुष्यांना विनंती आहे की तुम्हांला जेवढी आवश्यकता आहे तेवढीच झाडे कापा, तेही अत्यावश्यक असेल तर, कारण आम्ही सजीव आहोत.
_____________________________
Similar questions