India Languages, asked by shrutivare0139, 5 months ago

(2) आत्मकथन:
• दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा :
जुने दिवस पुन्हा येण्याची आशा
आजीने हौसेने आणलेली भांडी
पितळेची भांडी
1
पितळेच्या भांड्यांची खंत
पितळी भांड्यांचे अनेकविध उपयोग
भांड्यांची घेतलेली काळजी
स्वयंपाकखोलीचे किचनमध्ये रूपांतर
भांड्यांना केलेली कल्हई​

Answers

Answered by anushkabankar2006
69

Answer:

“ऐकलंत का रे सगळ्यांनी; आता या घराचे नूतनीकरण होणार आहे म्हणे!" अरे बापरे! म्हणजे आपल्या

उरल्यासुरल्या भावंडांना दुकानात विक्रीसाठी पाठवणार. घरात नव्या पद्धतीची भांडी आणायला हवीत; अशी वहिनीची कुरकूर चालू होतीच. म्हणजे आपला पितळी धातूचा जमाना संपला, असे म्हणायला हरकत नाही.

मला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी आजीने किती हौसेने आम्हांला विकत आणले होते. स्वयंपाकासाठी, पाणी साठवण्यासाठी,

वस्तू भरून ठेवण्यासाठी आम्हांला स्वयंपाकखोलीत मानाचे स्थान होते. घरातला रुचकर स्वयंपाक जेव्हाआमच्यामध्ये शिजायचा तेव्हा आम्हांला धन्य धन्य वाटायचे. किती मजेचे आणि मानाचे दिवस होते ते ! सणासुदीला श्रीखंड, बासुंदी, मसाला दूध यांनी आम्ही न्हाऊन निघायचो.

भरली वांगी, डाळिंबी, पंचामृत, डाळीची आमटी यांच्या वासाने आम्ही तृप्त असायचो. खरं तर आम्हाला गरम चुलीवर पदार्थ गरम करण्यासाठी पुन्हा पुन्हा ठेवत. आम्ही सारे लालबूंद होत असू. पण आलेले पाहणे बोटे चाटून जेवले की आजीचा समाधानी चेहरा पाहताना आम्हांला खूप बरे वाटे.

आजी आमची उत्तम बडदास्त ठेवत असे. आम्हांला दर दोन दिवसांनी चिंच-मीठ लावून लख्ख घासून घेतले जायचे. त्या वेळी स्वयंपाकखोलीतील फळी आमच्यामुळे झळाळून उठायची.वर्षांतून एकदा आमची रवानगी कल्हईवाल्याकडे व्हायची. तो तर पेटत्या धगीवर भाजून काढत असे. त्यानंतर आतून चकचकीत कल्हई लावत असे. त्या वेळी चंदेरी रंगाच्या कल्हईमुळे आम्हांला नवे झगे घातल्यासारखे वाटे.

आता स्वयंपाकखोलीचे किचन झाले. पितळेच्या जागी स्टील आले आणि आता तर निर्लेप; बजाज आले. काचेची आणि सिरॅमिकची भांडी तर कपाटात जागा पटकावून बसलीच आहेत.

पण आम्हांला आशा आहे, लोकांना परत चुलीवरचे जेवण आवडायला लागले आहे. तसेच आमचा (पितळी भांड्यांचा) जमाना परत येईल.

Similar questions