१2) अलिखित राज्यघटना कोणत्या देशाची
आहे?
Answers
Answer:
ब्रिटन, न्यूझीलंड, इस्राईल, सॅन मरिनो या देशांमधे लिखित स्वरुपातील संविधान अस्तित्वात नाही. कॅनडा हा देश ब्रिटनच्या राज्यकारभार करण्याची पद्धत आचरणात आणत असल्याने त्याचा समावेश मी केला नाही.
लिखित स्वरुपात संविधान अस्तित्वात नाही याचा अर्थ संविधानचअस्तित्वात नाही असा होत नाही तर एकाच ग्रंथामधे लोकशाही कशी चालावी याचे नियम केंद्रित झालेले नसते. संसदीय प्रथा व परंपरा, संमत झालेले कायदे आदि गोष्टींच्या विकेंद्रीकरणामुळे राज्यकारभार पद्धती ठरवणारा एकच ग्रंथ अस्तित्वात असावा अशी गरजच उरत नाही. त्यामुळे लिखित स्वरुपात राज्यघटना नसते.
१) ब्रिटन: ब्रिटनला राज्यघटनेची गरजच पडली नाही. याचं साधं कारण आहे की ब्रिटनमधे लोकशाही उत्क्रांत पावली. ती कोणत्याही क्रांतीतून प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे प्रवाही संसदीय परंपरा, प्रथा, वेगवेगळ्या कालखंडात संमत झालेले कायदे अशा बाबींमुळे ब्रिटनला संविधानाची गरज पडली नाही.
२)न्यूझीलंड: या देशाने लोकशाहीची वेस्टमिनिस्टर पद्धत मान्य केली आहे. न्यूझीलंडला स्वातंत्र्य देण्याचा कायदा ब्रिटनने संमत केला पण तो न्यूझीलंडमधील युरोपियन लोकांनी मान्य केला नाही. त्यांनी चार ते पाच ग्रंथ वा कागदपत्रं यांचा आधार घेऊन राष्ट्र चालवलं.
३)सॅन मरिनो: हे चिमुकलं राष्ट्र इटलीच्या आसपास आहे. या राष्ट्रालाही एकच लिखित संविधान नाही. या राष्ट्राचा कारभार इ.स. १६०० मधे लिहिल्या गेलेल्या स्टॅट्युटी या षष्ठखंडीय ग्रंथाच्या आधारे व इ.स. १९७४ च्या नागरी हक्क कायद्याने चालतो.
४)इस्राईल: इस्राईलने संविधान लिखाणासाठी समिती नेमली होती पण अरब युद्ध आणि इतर कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. त्याचबरोबर स्वतः बेन गुरियनने विरोध केला. नंतरही संविधान निर्माणासाठी प्रस्ताव आणले गेले पण ‘लोकनियुक्त संसद सदस्य’ एकमताला येऊच शकले नाहीत. त्यामुळे इस्राईलची संसद आवश्यक वाटेल तेव्हा कायदे करत गेली. माझ्या मते याचं दुसरंही कारण आहे. इस्राईलमधे अरब व पॅलेस्टाईनियन वंशाची लोकं आहेत. लिखित संविधान असतं तर या लोकांविषयी ठोस भूमिका घ्यावी लागली असती. परंतु हे करणं अशक्य आहे. याचं साधं कारण आहे इस्राईलच्या सीमा निश्चित नाहीत तर त्या विस्तारत्या राहणार आहेत. त्यामुळे नव्याने सामावल्या जाणाऱ्या अरबांना नको तितके हक्क दिले तर ते डोक्यावर बसतील हा विचार करुन लिखित स्वरुपातील संविधान नको असा विचार केला गेला असावा.
सौदी अरेबिया हेही एक उदाहरण असू शकतं पण तो लोकशाही देश नाही.
लिखित व अलिखित स्वरुपातील संविधानांचे स्वतःचे असे फायदे तोटे आहेत. त्याचबरोबर लिखित स्वरुपातील संविधान नसल्याने उपरोक्त राष्ट्रांचं खूप वाईट झालं असं नाही व लिखित स्वरुपातील संविधान असल्याने आपण फार तीर मारले असंही नाही. त्यामुळे लिखित की अलिखित या वादात अडकू नये. अंतिमतः व्यवस्थेच्या सुसूत्रतेसाठी अत्यंत लहान, सुटसुटीत व लिखित स्वरुपातील संविधान असावं व बाकी त्या व्यवस्थेला स्वतः विकसित होऊ द्यावं या मताचा मी आहे.
अ. आढे
जगामध्ये कोणते असे देश आहेत जे अजूनही गुलाम आहेत?
6,518 व्ह्यूज
आखाती देश म्हणजे काय? कोणते देश आखाती देशांमध्ये येतात?
3,174 व्ह्यूज
जगातील सर्वांत रहस्यमय घटना कोणत्या आहेत?
79,105 व्ह्यूज
इतिहासात एखाद्या देशाने केलेली सर्वात महागडी चूक कोणती होती?
66,626 व्ह्यूज
इतिहासातील अशी कोणती घटना आहे जी खोटी आहे पण अजूनही आपण खरीच समजतो?
11,841 व्ह्यूज
शुभम दातारकर
उत्तर दिल्याची तारीख 1 वर्षापुर्वी
बहुतेक देशांमध्ये लेखी राज्यघटना आहेत, तर अलिखित संविधान असलेल्या केवळ 5 देश आहेत.
"अलिखित" हा चुकीचा अर्थ घटना अस्तित्त्वात नाही असा समजला जाऊ नये कारण वास्तविकपणे घटना अस्तित्वात आहे आणि ती वेगवेगळ्या कायदेशीर कागदपत्रांवर व कायद्यानुसार आणि नियमांवर आधारित आहे - परंतु असे कोणतेही दस्ताऐवज नाहीत जे सर्व कायदे एकत्र करून परिभाषित करतील कि हे या देशाचे संविधान आहे.
हे असे देश आहेत ज्यात अलिखित आहेतः
इस्त्राईल
यूके
न्युझीलँड
सौदी अरेबिया
कॅनडा
या सर्व प्रकरणांमध्ये राज्यघटना कायदे आणि संसदेच्या नियमांच्या आधारे किंवा रॉयल डिक्रीज किंवा न्यायपालिकेने केलेले भाष्य यावर आधारित आहेत. तर, संविधान अस्तित्वात आहे, परंतु सर्व कायदे एका दस्तऐवजात आढळू शकत नाहीत.
जगामध्ये कोणते असे देश आहेत जे अजूनही गुलाम आहेत?
6,518 व्ह्यूज
आखाती देश म्हणजे काय? कोणते देश आखाती देशांमध्ये येतात?
3,174 व्ह्यूज
जगातील सर्वांत रहस्यमय घटना कोणत्या आहेत?
79,105 व्ह्यूज
इतिहासात एखाद्या देशाने केलेली सर्वात महागडी चूक कोणती होती?
66,626 व्ह्यूज
इतिहासातील अशी कोणती घटना आहे जी खोटी आहे पण अजूनही आपण खरीच समजतो?
11,841 व्ह्यूज
देश म्हणजे नेमके काय?
477 व्ह्यूज
जगाच्या इतिहासातील काही मजेदार घटना कोणत्या आहेत?
4,818 व्ह्यूज
जगातील कागदावरील सर्वात जुने हस्तलिखित कुठे आहे ?
533 व्ह्यूज
इतिहासातील एखादी मनोरंजक घटना विस्ताराने सांगाल का?
64,347 व्ह्यूज
सर्व घटना विधिलिखित असतात का?
1,098 व्ह्यूज
जगात असा कोणता देश आहे जिथे कोणत्याच प्रकाराचा गुन्हा होत नाही?
1,150 व्ह्यूज
तुमच्या मते जागतिक इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या घटना कोणत्या आहेत?
4,475 व्ह्यूज
जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे?
814 व्ह्यूज
कोणत्या देशाचा इतिहास निराळ्या आणि आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेला आहे?
2,194 व्ह्यूज
जगातील सर्वात मजबूत गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे?
1,104 व्ह्यूज
आमच्याबद्दलकरिअरगोपनीयताअटीसंपर्कभाषा