2. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 50 मी आहे. या भूखंडाला तीनपदरी तारेचे कुंपण
घालण्यासाठी प्रति मीटर ₹25 दराने किती खर्च होईल?
(A) ₹25,000 (B) ₹15,000 (C) ₹5,000 (D) ₹3,750
Answers
Answered by
8
Answer:
B) ₹15,000
तीनपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी ₹15,000 इतके खर्च होतील.
Step-by-step explanation:
प्रथमत:
आपल्याला चौरसाकार भूखंडाची परिमिती काढावी लागेल म्हणजेच चौरसाची परिमिती.
चौरसाची परिमिती = 4 × बाजूंची लांबी
⇒ 4 × 50
⇒ 200 मी
म्हणजेच,
चौरसाची परिमिती = 200 मी
दिलेल्या प्रश्ना नुसार,
चौरसाकार भूखंडाला तीनपदरी तारेचे कुंपण म्हणजेच
तीन पट तार लागेल.
चौरसाची परिमिती = 200 मी
⇒ 200 × 3
⇒ 600 मी
आता आपल्याला तारेच्या कुंपणासाठी किती खर्च येईल ते काढावा लागेल.
तारेच्या कुंपणाचा प्रति मीटर दर = ₹ 25
तर,
एकूण दर (खर्च) = चौरसाची परिमिती × तारेच्या कुंपणाचा प्रति मीटर दर × तीनपदरी तार
⇒ 200 × 25 × 3
⇒ 15,000
म्हणजेच वरील स्पष्टीकरण असे स्पष्ट होते की,
तीनपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी ₹15,000 इतके खर्च होतील.
Similar questions