Science, asked by reshmachavan819, 2 months ago

2) ज्या संमिश्रापासून वितळतार बनवलेली असते त्या घटकांची नावे लिहा.​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

विद्युत् मंडलातून जाणारा प्रवाह ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाला, तर ते मंडल आपोआप खंडित होऊन त्यातील प्रवाह आपोआप थांबावा व मंडलातील उपकरणांचे संरक्षण व्हावे, अशी व्यवस्था मंडलात करावी लागते. कारण मंडलातील विद्युत् दाबात अचानक वाढ झाली वा मंडलातील एखाद्या उपकरणात बिघाड झाला व त्यामुळे मंडलातून एकदम फार मोठा विद्युत् प्रवाह जाऊ लागला किंवा मंडलाच्या क्षमतेपेक्षा थोडाच जास्त प्रवाह पण बराच वेळ वाहत राहिला, तर त्यामुळे मंडलातील संवाहक व उपकरणे यांना धोका पोहोचू शकतो किंवा त्यांच्यावरील विद्युत् निरोधकाचे आवरण खराब होण्याची शक्यता असते. यासाठी सोप्यात सोपा मार्ग म्हणजे जादा विद्युत् प्रवाहामुळे सहज वितळणारी धातूची तार मंडलाच्या एकसरीत बसविणे हा होय. या तारेचे तापमान तिच्यातून जाणऱ्या प्रवाहाच्या मूल्यावर अवलंबून असते. तारेचे आकारमान आणि धातू वा मिश्रधातूचा प्रकार यांनुसार प्रवाह यांनुसार प्रवाह जेव्हा एका विशिष्ट मर्यादेहून जास्त होतो, तेव्हा हा तारेचा तुकडा अतिशय तापून वितळतो व तुटतो. यामुळे मंडल खंडित होऊन प्रवाह थांबतो. या कामी वापरल्या जाणाऱ्या तारेस वितळतार म्हणतात. या तारा शिसे, कथिल, तांबे इ. धातू अथवा कमी तापमान कमी तापमानास वितळणाऱ्या मिश्रधातूंपासून बनविलेल्या असतात. वितळतारेचा व्यास व धातू तिच्यामधून सतत पाठविण्याच्या विद्युत् प्रवाहाच्या उच्चतर मर्यादेवरून ठरवावा लागतो. त्यासाठी वापरात असलेल्या काही धातूंच्या तारांचे आकारमान (व्यास) व ती तार वितळण्यास लागणारा कमीत कमी प्रवाह कोष्ठकात दिलेले आहेत.

वितळतारांसाठी वापरण्यात येणाऱ्या काही धातू व त्यांचे गुणधर्म

तार वितळण्याचा प्रवाह

(अँपिअर)

तारेचा व्यास अंक

शिसे

कथिल

लोखंड

तांबे

१०

२५

५०

१००

२००

२५०

२३

२०

१५

११.५

२५

२१

१६

१२.५

८.५

३.५

१.५

२९

२४

१९

१६

१२

६.५

३८

३३

२६

२२

१८

१५

१३.५

कोष्टकावरून असे ध्यानात येईल की, विशिष्ट प्रवाह रोखण्यास योग्य त्या व्यासाचीच वितळतार वापरावयास हवी. व्यवहारात अनेकदा मोठ्या व्यासाची तार अथवा योग्य व्यासाच्या वितळतारांचे अनेक वेढे देणे धोक्याचे असते. कारण त्यामुळे उपकरणामधून मर्यादेहून जास्त प्रवाह वाहूनसुद्धा त्या तारा योग्य त्या वेळी न वितळल्यामुळे मंडल परिरक्षणाचा मूळ उद्देशच सफल होत नाही.

सर्वसाधारणपणे कमी प्रवाहासाठी शिशाची वितळतार वापरतात. कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे वाढत्या प्रवाहाबरोबर वितळतारेचा व्यासाही वाढत जातो. सुमारे ५० अँपिअरपर्यंत शिशाची तार वापरतात पण त्यापुढे शिशाच्या तारेचा व्यास फारच जास्त होत असल्याने सु. ५०० अँपिअरपर्यंत तांब्याची तार वापरतात आणि त्याहून जास्त मोठ्या प्रवाहासाठी आतून शिसे भरलेली तांब्याची पातळ पत्र्याची नळी वापरतात मंडलातील प्रवाह वाढतो तेव्हा प्रथम या नळीतील शिसे वितळून खाली पडते व नंतर सर्वच प्रवाह तांब्याच्या नळीतून गेल्याने शेवटी नळीही वितळून जाते. अशी नळी बंदिस्त पेटीत ठेवलेली असते.

वितळतार वितळल्यावर मंडल खंडित होते व ती तार बदलल्याशिवाय मंडलातून परत प्रवाह सुरू होत नाही. बऱ्याच वेळा मंडलातील विद्युत् दाबातील चढउतार, तसेच विद्युत् प्रवाहातील वाढ काही क्षणांपुरतीच असते व परत लगेच विद्युत् दाब वा प्रवाह पूर्ववत होतो. अशा वेळी वितळतार वितळणे अनावश्यक ठरते. त्या दृष्टीने कोठल्याही मंडलाची किती वेळ व कितीपट जास्त प्रवाह सहन करण्याची क्षमता आहे, हेही पाहणे फायद्याचे ठरते व त्यामानाने थोडी उशिरा व थोड्या जास्त प्रवाहावर वितळणारी वितळतार वापरता येते. अशा दृष्टीने पाहता पुढील गोष्टींचा विचार योग्य आकारमानाची वितळतार बसविणे जास्त चांगले. कोठल्याही धातूची तार वितळण्यास लागणारा कालावधी तीतून वाहणाऱ्याप्रवाहाच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजेच जर १२०% प्रवाहावर तार वितळण्यास ५ सेकंद लागले, तर १३०% प्रवाहावर तीच तार वितळण्यास ३ सेकंद लागातात आणि १५०% प्रवाहावर ती केवळ अर्ध्या सेकंदात वितळेल (सर्वसाधारणपणे ४४० व्होल्ट विद्युत् दाब आणि १०० अँपिअर प्रवाहापर्यंत).

वितळतारधारक : प्रवाह जास्त होताच अचानक वितळणाऱ्या धातूच्या तारेमधील उष्णतेमुळे व तिचा रस चहूकडे पसरून आसपासच्या लोकांना इजा होऊ नये, तसेच आसपासच्या भागाचे आगीपासून रक्षण व्हावे, म्हणून वितळतार ही नेहमीच स्विच फलकावर निरोधक व उच्चतापसह पदार्थाच्या (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्यापदार्थाच्या (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या पदार्थाच्या (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या पदार्थाच्या उदा., चिनी मातीच्या) पेटीत अथवा नळीत बंद करून ठेवतात. त्याचे विद्युत् दाबानुसार विविध प्रकार आढळतात.

कमी दाब मंडल: चिनी मातीची वितळतारधारक पेटी: कमी विद्युत् दाबाच्या (२२० वा ४४० व्होल्टापर्यंत) मंडलातील संवाहकाची दोन टोके वितळतारधारक पेटीच्या बैठकीवरीलच दोन स्पर्शकांना जोडतात आणि वितळतारेचा तुकडा पेटीच्या झाकणात दोन स्पर्शकांमध्ये बसविलेला असतो. हे झाकण नीट दाबून पेटीवर बसविले म्हणजे स्पर्शकांची दोन्हीकडील टोके एकमेकांत अडकतात आणि वितळतार मंडलाच्या एकसरीत येते. अशा पेटीची सर्वसाधारण रचना आ. १ मध्ये दाखविलेली आहे. १५ अँपिअरांपेक्षा जास्त प्रवाहाकरिता वितळतार बसविलेल्या या पेट्या दुसऱ्याआ एका लोखंडी पेटीत बंद करून ठेवतात. यातील वितळतारेचा तुकडा वितळल्यानंतर त्याच्या जागी दुसरा बसविता येतो.

Answered by haertbeatbadboy
4

Answer:

वितळतार : (फ्यूज). विद्युत् मंडलातून जाणारा प्रवाह ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाला, तर ते मंडल आपोआप खंडित होऊन त्यातील प्रवाह आपोआप थांबावा व मंडलातील उपकरणांचे संरक्षण व्हावे, अशी व्यवस्था मंडलात करावी लागते. कारण मंडलातील विद्युत् दाबात अचानक वाढ झाली वा मंडलातील एखाद्या उपकरणात बिघाड झाला व त्यामुळे मंडलातून एकदम फार मोठा विद्युत् प्रवाह जाऊ लागला किंवा मंडलाच्या क्षमतेपेक्षा थोडाच जास्त प्रवाह पण बराच वेळ वाहत राहिला, तर त्यामुळे मंडलातील संवाहक व उपकरणे यांना धोका पोहोचू शकतो किंवा त्यांच्यावरील विद्युत् निरोधकाचे आवरण खराब होण्याची शक्यता असते. यासाठी सोप्यात सोपा मार्ग म्हणजे जादा विद्युत् प्रवाहामुळे सहज वितळणारी धातूची तार मंडलाच्या एकसरीत बसविणे हा होय. या तारेचे तापमान तिच्यातून जाणऱ्या प्रवाहाच्या मूल्यावर अवलंबून असते. तारेचे आकारमान आणि धातू वा मिश्रधातूचा प्रकार यांनुसार प्रवाह यांनुसार प्रवाह जेव्हा एका विशिष्ट मर्यादेहून जास्त होतो, तेव्हा हा तारेचा तुकडा अतिशय तापून वितळतो व तुटतो. यामुळे मंडल खंडित होऊन प्रवाह थांबतो. या कामी वापरल्या जाणाऱ्या तारेस वितळतार म्हणतात. या तारा शिसे, कथिल, तांबे इ. धातू अथवा कमी तापमान कमी तापमानास वितळणाऱ्या मिश्रधातूंपासून बनविलेल्या असतात. वितळतारेचा व्यास व धातू तिच्यामधून सतत पाठविण्याच्या विद्युत् प्रवाहाच्या उच्चतर मर्यादेवरून ठरवावा लागतो. त्यासाठी वापरात असलेल्या काही धातूंच्या तारांचे आकारमान (व्यास) व ती तार वितळण्यास लागणारा कमीत कमी प्रवाह कोष्ठकात दिलेले आहेत.

वितळतारांसाठी वापरण्यात येणाऱ्या काही धातू व त्यांचे गुणधर्म

तार वितळण्याचा प्रवाह

(अँपिअर)

तारेचा व्यास अंक

शिसे

कथिल

लोखंड

तांबे

१०

२५

५०

१००

२००

२५०

२३

२०

१५

११.५

२५

२१

१६

१२.५

८.५

३.५

१.५

२९

२४

१९

१६

१२

६.५

३८

३३

२६

२२

१८

१५

१३.५

कोष्टकावरून असे ध्यानात येईल की, विशिष्ट प्रवाह रोखण्यास योग्य त्या व्यासाचीच वितळतार वापरावयास हवी. व्यवहारात अनेकदा मोठ्या व्यासाची तार अथवा योग्य व्यासाच्या वितळतारांचे अनेक वेढे देणे धोक्याचे असते. कारण त्यामुळे उपकरणामधून मर्यादेहून जास्त प्रवाह वाहूनसुद्धा त्या तारा योग्य त्या वेळी न वितळल्यामुळे मंडल परिरक्षणाचा मूळ उद्देशच सफल होत नाही.

सर्वसाधारणपणे कमी प्रवाहासाठी शिशाची वितळतार वापरतात. कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे वाढत्या प्रवाहाबरोबर वितळतारेचा व्यासाही वाढत जातो. सुमारे ५० अँपिअरपर्यंत शिशाची तार वापरतात पण त्यापुढे शिशाच्या तारेचा व्यास फारच जास्त होत असल्याने सु. ५०० अँपिअरपर्यंत तांब्याची तार वापरतात आणि त्याहून जास्त मोठ्या प्रवाहासाठी आतून शिसे भरलेली तांब्याची पातळ पत्र्याची नळी वापरतात मंडलातील प्रवाह वाढतो तेव्हा प्रथम या नळीतील शिसे वितळून खाली पडते व नंतर सर्वच प्रवाह तांब्याच्या नळीतून गेल्याने शेवटी नळीही वितळून जाते. अशी नळी बंदिस्त पेटीत ठेवलेली असते.

Explanation:

I hope help you ☺️

taka care and keep smiling ☺️❤️❤️☺️

Similar questions