2] कापसाचे उपयोग लिहा.
Answers
Answer:
वस्त्रप्रावरणाच्या निर्मितीकरिता लागणाऱ्या वनस्पतिज धाग्यासाठी उपयुक्त असलेली कापूस ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बोंडातून मिळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र तंतूमय भागालाही कापूस असे म्हणतात. कापासाच्या रानटी अवस्थेतील काही जाती उष्ण प्रदेशांत आढळत असल्याने तो मूलत: उष्णदेशीय असावा असे मानतात.
Answer:
वस्त्रनिर्मितीकरिता लागणारा वनस्पतिजन्य मऊ, पांढरा व तंतुमय पदार्थ आहे.
Explanation:
कापूस हा एक वस्त्रनिर्मितीकरिता लागणारा वनस्पतिजन्य मऊ, पांढरा व तंतुमय पदार्थ आहे. कपाशीच्या बोंडापासून कापूस मिळतो. कपाशी ही उष्ण प्रदेशीय वनस्पती माल्व्हेसी कुलातील आहे. कपाशीच्या लागवड केल्या जाणार्या गॉसिपियम आर्बोरियम(देवकापूस), गॉ.हर्बेशियम, गॉ.हिरसुटम आणि गॉ. बार्बाडेन्स या चार जाती मुख्य आहेत. यांपैकी देवकापूस ही जात मूळची भारतातील आहे. आफ्रिकेचा उत्तरेकडील भाग व आशियाचा प्रदेश हे कापसाचे मूळ स्थान आहेत. मूळची ही उष्ण प्रदेशीय वनस्पती असून सध्या सर्वाधिक कापूस उत्पादनक्षेत्र समशीतोष्ण प्रदेशात आहे.