Science, asked by jitesh9569, 1 month ago

2) खाली दिलेल्या चिन्हांचा पर्यावरण संवर्धन संदर्भात अर्थ स्पष्ट करा.
standard 10th ​

Attachments:

Answers

Answered by Rameshjangid
0

Answer:

पर्यावरण संवर्धनाच्या माहितीचा प्रचार व प्रसार करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे.

Explanation:

Step : 1 ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत, त्यांचा आधी अभ्यास करू. या समस्यांवर काही उपाय करून त्यांची व्याप्ती कमी करणे, हे महत्त्वाचे आहे.

झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वांत सहज आणि सोपा उपक्रम आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ. देशी झाडे आणि प्रदूषण, नागरीकरण इत्यादी परिस्थितीला तोंड देणारी झाडे लावण्याचा प्रयत्न करू.

Step : 2 घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून, शाळेतून परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे हे करू, त्यासाठी लोक-सहभाग आवश्यक आहे.

Step : 3 प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो.

Step : 4. जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवामानबदल होत आहे. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करता येईल.

Step : 5 आजूबाजूच्या पशु-पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे हे काम करू.

Step : 6  पर्यावरण संवर्धनाच्या माहितीचा प्रचार व प्रसार करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे.

To learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/7882461?referrer=searchResults

https://brainly.in/question/11813672?referrer=searchResults

#SPJ1

Similar questions