2) पुढील कृती पूर्ण कर. संतकार्याची समान फलश्रुती❓
Answers
Answered by
4
Answer:
Answer:संतकार्याची फलश्रुती :- महाराष्ट्रातील संतांनी लोकांना चांगले संदेश दिले. त्यांनी लोकांना माणुसकी व मानवताधर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे ही शिकवण दिली. त्यांनी केलेल्या उपदेशामुळे लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली. दुष्काळ, परकीय आक्रमण किंवा इतर कोणतीही नैसर्गिक संकटे आली तरीही त्यांची परवा न करता कसे जगावे, याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार बनला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती, म्हणजेच धर्माला उतरती कळा लागली होती. धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर होता. अशा वेळी लोकांचे मनोबल वाढविणे गरजेचे होते. ते कार्य संतांनी केले. संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगू लागले.
Similar questions