India Languages, asked by zaherabishaikh, 2 days ago

2) पुढील वाक्याचे आज्ञार्थी करा. अशा लोकांशी प्रेमाने बोलावे.​

Answers

Answered by MathCracker
10

प्रश्न :-

2) पुढील वाक्याचे आज्ञार्थी करा. अशा लोकांशी प्रेमाने बोलावे.

उत्तर :-

आज्ञार्थी वाक्य :- अशा लोकांशी प्रेमाने बोला.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

अधिक माहिती जाणून घ्या :-

मराठी भाषेतील वाक्य प्रकार :

अर्थावरून पडणारे प्रकार :

1. विधांनार्थी वाक्य –

ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा .

  • मी आंबा खातो.

2. प्रश्नार्थी वाक्य –

ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • तू आंबा खल्लास का?

3. उद्गारार्थी वाक्य –

ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • अबब ! केवढा मोठा हा साप

4. होकारार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

उदा .

  • माला अभ्यास करायला आवडते.

5. नकारार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • मी क्रिकेट खेळत नाही.

6. स्वार्थी वाक्य –

ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • मी चहा पितो.

7. आज्ञार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • तो दरवाजा बंद कर (आज्ञा)

8. विधार्थी वाक्य –

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)

9. संकेतार्थी वाक्य –

जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार :

1. केवळ वाक्य –

ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • राम आंबा खातो.

2. संयुक्त वाक्य –

जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.

3. मिश्र वाक्य –

जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. \:

Similar questions