2) प्राचीन कालखंडचा अभ्यास कोणत्या साधनाद्वारे करता येईल ते साधने लिहा.
Answers
Answer:
कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो.
mark me brainlist
Answer:
भौतिक साधने :- इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनाची माहिती घेऊ. नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.