India Languages, asked by prernavlko6440, 10 months ago

25 vakprachar in Marathi with meaning and sentence

Answers

Answered by AravindhPrabu2005
11

Answer:

१) कान देणे : लक्षपूर्वक ऐकणे

आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.

२) आकाश कोसळणे : मोठे संकट येणे

घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सोनाबाईंवर आकाश कोसळले.

३) सिद्ध होणे : तयार होणे

गडावर चढण्यासाठी रावी सिद्ध झाली.

४) पारा चढणे : रागावणे

घरी उशिरा आलेल्या साहिलला पाहून बाबांचा पारा चढला.

५) खडकातून पाणी काढणे : अशक्य गोष्ट पार पाडणे

नापीक जमिनीत लागवड करुन महादूने जणू खडकातून पाणी काढले.

६)निश्चय दांडगा करणे : ठाम निश्चय करणे

पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता.

७) मनस्ताप सहन करणे : मनाला होणारा त्रास साेसणे

राम नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला.

८) ताब्यात घेणे : सर करणे

गिर्यारोहकाने कडा सर केला होता.

९) मन खट्टू होणे : वाईट वाटणे

या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही, हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले.

१०) एका पायावर तयार असणे : सदैव तत्पर असणे

सिनेमा पहायला जाऊया म्हटले की रिया नेहमी एका पायावर तयार होते.

Hope it Helps!!!!

Answered by sandippatil47240
3

Explanation:

यथासांग पार पाडणे वाक्यप्रचाराचा अर्थ

Similar questions