3) भूखंड मंच म्हणजे काय?
Answers
Answered by
11
Answer:
सागरकिनाऱ्याला लागून असणारा उथळ सागरतळ म्हणजे सागरमग्न खंडभूमी होय. खंड-फळी व भूखंड मंच या पर्यायी संज्ञाही सदर भूविशेषासाठी वापरल्या जातात
Explanation:
I Hope its helpful to you!!
Answered by
0
Answer:
किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा जो भाग असतो त्याला भूखंड मंच असे म्हणतात.
भूखंड मंच हा सागराच्या तळाशी असलेला उथळ भाग आहे. त्याला समुद्रबूड असेही म्हटले जाते. या जमिनीचा उतार मंद असतो.
भूखंड मंच याचा विस्तार सर्वत्र एक सारखा नसतो. काही खंडांच्या जवळ भूखंड मंच अरुंद आहे तर काही खंडांच्या जवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद आहे.
भूखंड मंच त्याची खोली साधारणतः समुद्रसपाटीपासून २०० मीटरपर्यंत असते. भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावर आढळलेली दिसून येतात.
Similar questions