History, asked by aavte81, 3 months ago

3 In what year Woods Kallithea' Published?
वूडचा स्वलीता कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला?​

Answers

Answered by jonhmarkwamilda88
3

Answer:

i dont know what are your saying

Answered by rajraaz85
0

Answer:

इंग्रजी सत्ता भारतात स्थापन झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात काही शैक्षणिक धोरण राबवण्याचे ठरवले.

भारतीयांना पाश्चिमात्य शिक्षण द्यावे की पौर्वात्य हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तसेच जे ही शिक्षण भारतीय लोक घेतील ते भारतीय भाषांमध्ये हवे की परकीय भाषांमध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या वेळी उद्भवला. अशा सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या वेळी सर चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने भारतीय शैक्षणिक धोरणाबद्दल जो अहवाल तयार केला त्या अहवालाला 'वुडचा खलिता' किंवा 'वुडचा अहवाल' असे म्हणतात.

या समितीने आपला अहवाल १९ जुलै१८५४ या दिवशी सादर केला. या अहवालात नोंदवले लेख काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१. शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षणाला स्थान दिले गेले नाही.

२. स्त्रियांनी पुढे येऊन शिक्षण घ्यावे यासाठी विशेष तरतूद या अहवालात केली गेले.

३. शिक्षणाचा दर्जा व शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी शिक्षण हे इंग्रजी व प्रादेशिक भाषेत देण्यात यावे असे या अहवालात म्हटले गेले.

४. त्या वेळच्या भारताच्या काही मुख्य शहरांमध्ये विद्यापीठे स्थापन करण्याच्या शिफारशी या अहवालात नोंदवल्या होत्या.

१८५७ मध्ये वुडच्या खलीत्यानुसार कोलकत्ता विद्यापीठ मुंबई विद्यापीठ व मद्रास विद्यापीठाची स्थापना झाली.

Similar questions