(3) कथालेखन :
5
• पुढे कथेचा पूर्वार्थ दिलेला आहे. त्याच्या आधारे कथेचा उत्तरार्ध लिहा :
आम्हांला उन्हाळी सुट्टी लागणार, म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खूश होतो. त्याला
कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते. १० मे ते १५ मे अशी
सहलीची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. “वैभवदादा, कॅमेरा बरोबर
घ्यायचा का?'' सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. "अग, हो घेऊ या," म्हणून मी पुन्हा तयारीला
लागलो, बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे,
यांसारख्या सहलीला आवश्यक बाबींत मी दंग झालो होतो. आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता,
बघता बघता १० मे ची पहाट उजाडली. आई, बाबा, मी, सानिका सर्व तयार झालो. आवराआवर झाली
आणि आम्ही सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि ...
Answers
लक्षात ठेवण्यासाठी राइड
- सुट्ट्या किंवा सुट्ट्या हे शब्द आहेत जे प्रत्येकाला आनंद देतात परंतु वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांचा अर्थ भिन्न असतो. काही लोकांसाठी याचा अर्थ आपल्या काकांच्या बोटीत मासेमारी करणे किंवा आपल्या आजीच्या जागी जाणे किंवा फक्त आळशी होणे असा होतो.
- माझ्यासाठी म्हणजे पुस्तके वाचणे, चित्रपट पाहणे, नवीन छंद जोपासणे आणि खेळणे. माझ्या सुट्टीच्या सुरुवातीला मी फक्त झोपलो होतो. मग मी माझे सुट्टीचे घरचे काम करायचे ठरवले.
- मग मी हॅरी पॉटरची पुस्तके वाचायला सुरुवात केली. माझे आई-वडील मला नोएडा येथील वॉव-वर्ल्ड्स ऑफ वंडरमध्ये घेऊन गेले.
- आम्ही तिथे खूप मजा केली. अशा राइड्स होत्या ज्यांनी मला पूर्णपणे घाबरवले आणि माझा श्वास सोडला पण तरीही मी त्यांचा आनंद लुटला. परतण्याचा विचार करत असतानाच पाऊस सुरू झाला. आम्ही भिजलो. कसा होता दिवस? ते फक्त भव्य होते.
Answer:
बाबांनी दार उघडले दारासमोर पोस्टमन काका उभे होते. त्यांच्या हातात एक लिफाफा होते. पोस्टमन काका जवळील लिफाफा बाबांनी घेतला. लिफाफा उघडला तर त्यात एक पत्र होते. बाबाने ते पत्र वाचले. पत्र वाचून झाल्यावर बाबांच्या चेहऱ्यावर एक नाराजी दिसू लागली. आम्ही सारे चिंतेत पडलो. मग मीच बाबांना धीर देत विचारले बाबा काय झाले त्या पत्रात काय लिहिले होते. " मला कामावरून पत्र आले आहे की लवकरच मी माझ्या नोकरीवर पुन्हा हजर रहावे. सध्या अतिरिक्त काम वाढले आहे. ते काम करण्यासाठी माणसांची गरज आहे तर तुम्ही नोकरीवर हजर रहा". असे पत्रातले मजकूर बाबांनी आम्हाला वाचून दाखवणे. बाबांनी मला व सानिकाला समजावून सांगितले. आम्ही सहलीला जाण्याची फार स्वप्ने रंगवली होती मात्र ती आता मातीमोल झाली होती. मात्र बाबांनी पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला घेऊन जाण्याचे कबूल केले. तेव्हा कुठे सानिकाचा जीव भांड्यात पडला. आम्ही पुढच्या उन्हाळी सुट्टीची आतुरतेने वाट पाहू लागलो.